शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मराठी वर्षाचे शेवटचे सोम प्रदोष व्रत २०२६: ‘या’ शिव मंत्रांचा जप करा; पाहा, सोपा पूजा विधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 06:06 IST

Falgun Som Pradosh Vrat March 2026: फाल्गुन महिन्यातील सोम प्रदोष व्रत कसे करावे? कोणत्या शिव मंत्रांचा आवर्जून जप करावा? जाणून घ्या...

Falgun Som Pradosh Vrat March 2026: मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू असून, अवघ्या तासांनी या महिन्याची सांगता होणार आहे. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, फाल्गुन महिन्यातील सोम प्रदोष व्रताचरण आहे. हे या मराठी वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत असणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वी शिवाची आराधना करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. जाणून घेऊया...

प्रदोष दिनी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रदोष व्रत सोमवारी येणे विशेष ठरते. यंदा सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी फाल्गुन सोम प्रदोष व्रत आहे. 

फाल्गुन सोम प्रदोष व्रत विधी

प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असेल तर शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. षोडषोपचार पद्धतीने शक्य नसेल, तर पंचोपचार पद्धतीने शिव पूजन करावे. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. 

‘या’ शिव मंत्रांचा अवश्य जप करा

'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते.

सोम प्रदोष व्रतात चंद्राचे स्मरण करावे

सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्रांचा जप करावा, असे म्हटले जाते. दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥, हा नवग्रह मंत्रातील चंद्राचा मंत्र आहे. याशिवाय, ॥ ॐ सों सोमाय नम:॥, ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:॥ हे चंद्राचे प्रभावी मंत्र मानले जातात. ॥ ॐ पद्मद्वाजय विद्महे हेमा रूपाय धीमहि तन्नो चंद्र: प्रचोदयात् ॥, हा चंद्राचा गायत्री मंत्र आहे. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी चंद्र देवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्यात. तसेच चंद्र देवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. असे केल्याने चंद्र देवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Som Pradosh Vrat 2026: Shiva mantras, puja vidhi explained.

Web Summary : Auspicious Som Pradosh Vrat falls on March 16, 2026. Worship Lord Shiva with mantras like 'Om Namah Shivaya' and Chandra mantras. Fast, perform puja, and donate for blessings.
टॅग्स :Pradosh Vratप्रदोष व्रतPuja Vidhiपूजा विधीLord Shivaमहादेवspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण