शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

Career Astro Tips: मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर व्हावं हे पालकांचं स्वप्नं, पण ग्रहदशा सांगते वेगळंच भाकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:39 IST

Career Astro Tips: दहावी-बारावीच्या निकालानंतर 'पुढे काय?' या मुलांच्या करिअरचा मागोवा घेणारा प्रश्न उभा राहतो तेव्हा ग्रहांची साथ मार्गदर्शक ठरते (भाग २)

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पत्रिकेत गुरु बलवान असेल, तर शिक्षण क्षेत्रात जातकाची प्रगती होते. शिक्षक पर्यायाने मुख्याध्यापक हे पद मिळते. १, ४, ५, ९, १० ह्या भावात गुरु तसेच १० मध्ये मंगळ, रवी असतील तर शिक्षण क्षेत्रात यश मिळते. अधिकार योगासाठी ९ भावात गुरु तसेच २, ६ सुद्धा गुरूशी संबंधित असावेत. शनी दशमात असेल तर अनेकदा सत्ता किंवा मोठे पद मिळते. ह्या सर्वासाठी अर्थात दशा अनुकूल असाव्या लागतात. 

स्पर्धा परीक्षेत यश – आजकाल परदेशी शिक्षण घेण्यासाठी किंवा भारतात सुद्धा अनेक उच्च शैक्षणिक प्रवेश हे CET, CAT ह्या माध्यमातून घेतले जातात . आजकाल स्पर्धा परीक्षा आपला प्रवेश आणि आयुष्याची पुढील वाटचाल ठरवताना दिसतात . ह्यासाठी प्रामुख्याने ६ वा भाव बघावा तसेच त्या नुसार दशाही अनुकूल हवी . 

Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!

रवी, गुरु, बुधाचे गोचर भ्रमण अशावेळी पाहावे लागते. सरकारी नोकरी म्हटली की रवी आणि ६, १० भाव आलेच. पोलीस, सैनिक, मिलिटरीसाठी अर्थात धाडसी मंगळ सोबत राहू  ४, १० मध्ये चांगले फलित देतात. 

चिकित्सक राशी कन्या आणि संशोधक राशी वृश्चिक ह्या वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रथम क्रमांकावर येतात . रवी, बुध, गुरु तसेच शुक्र सुद्धा बघावा. ६, १० तसेच २ भाव धन देणारा. मकर, धनु राशीही ह्या व्यवसायासाठी पोषक आहेत. मंगळ सुस्थितीत असेल तर व्यक्ती उत्तम सर्जन होते. मंगल १, ५, ९ किंवा २ ६, १० ह्या राशीत स्थित असावा.व्ययेश मंगळ दशमात आणि इतर ग्रहांची साथ उत्तम डॉक्टर होऊ शकते.  

आरोग्याचा कारक रवी बघावा तसेच चिकाटी देणारा ग्रह शनी. डॉक्टर हा समाजात वावरणारा असतो. त्यामुळे चंद्र बघावा. ज्याचा चंद्र अतिशय शुभ असतो तो समाजात लोकप्रिय होतो. आता ह्या व्यवसायातून लाभ देण्यासाठी धन आणि लाभ भावाची दशा बघावी . 

व्यवसाय कुठलाही असो माणसे जोडण्याची कला अवगत असेल तर व्यवसाय चालेल . त्यासाठी बुध, शुक्र चांगले हवेत . दशम भावातील गुरु शुक्र मोठे व्यवसाय लाभ दर्शवतात . उत्तम व्यवस्थापन रवीकडे तर सत्ता मंगळ राहुकडे असते. 

प्रत्येक व्यवसायासाठीचे शिक्षण , भांडवल अनेक गोष्टींसाठी पहावी लागते ती मानसिकता.  मला हे करायचे आहे आणि ते करायचे आहे असे नुसते म्हणून चालत नाही . मी मोठे बुटी पार्लर उघडले पण कुणीच तिथे फिरकतसुद्धा नाही, तर केलेला डामडौल फुकट .त्यामुळे व्यवसाय करण्यापूर्वी आपली मानसिकता, त्या व्यवसायातील खाचखळगे आपल्याला कितीसे समजत आहेत तसेच त्यातील चढ उतारावर पाय रोवून उभे रहायची मानसिकता आपली आहे का? धंद्यात चिकाटी, दूरदृष्टी , माणसे ओळखण्याची कुवत सर्व लागते, सगळ्यात मुख्य स्वतः कष्ट करायची ताकद लागते , नफ्या तोट्याचे गणित मांडावे लागते कारण ते कोलमडले तर व्यक्ती कर्ज बाजारी होते . एखादा व्यवसाय करणे हे तप करण्यापेक्षा कमी नाही. आजकालची मुले कसलाही विचार न करता वडिलांना मला धंदा करायचा आहे असे सांगतात आणि पालक सुद्धा त्यांना कर्ज घेवून देतात . आपला मुलगा पायावर उभा राहण्याची स्वप्न पाहणे वेगळे आणि त्यासाठी परिश्रम घेवून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे वेगळे . सर्वांगीण विचार केला तर यश दूर नाही , पण तसे झाले नाही तर जीवन नको त्या गर्तेत अडकेल म्हणून हे चार शब्द .

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन