Braj Holi 2026: मथुरा वृंदावन दोन-पाच दिवस नाही तर महिनाभर खेळतात होळी; वाचा वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 07:00 IST2026-02-25T07:00:01+5:302026-02-25T07:00:02+5:30

Braj Holi 2026: मथुरा -वृंदावन ही राधे कृष्णाची नगरी, तिथे होळीचा उत्सव महिनाभर चालतो, ज्यात लाडू, लाठ्या, रंग, फुलं अशी विविध प्रकारे होळी खेळली जाते. 

Braj Holi 2026: Mathura Vrindavan plays Holi for a month, not two-five days; Read the feature! | Braj Holi 2026: मथुरा वृंदावन दोन-पाच दिवस नाही तर महिनाभर खेळतात होळी; वाचा वैशिष्ट्य!

Braj Holi 2026: मथुरा वृंदावन दोन-पाच दिवस नाही तर महिनाभर खेळतात होळी; वाचा वैशिष्ट्य!

मथुरा-वृंदावनातील 'ब्रज की होली' ही जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ दोन दिवसांचा सण नसून, ब्रजमध्ये हा उत्सव महिनाभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षीच्या ब्रज होळी कोणत्या दिवशी कोणत्या पद्धतीने खेळली जाणार आहे ते जाणून घेऊ. 

Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा

उत्तर प्रदेशातील ब्रज भूमीमध्ये होळीचा उत्साह वसंत पंचमीपासूनच सुरू होतो. कान्हाच्या या नगरीत होळी केवळ रंगांनी नाही, तर भक्ती आणि परंपरेने खेळली जाते. यावर्षीच्या उत्सवाचे प्रमुख दिवस खालीलप्रमाणे आहेत:

ब्रज होळी २०२६: मुख्य तारखा (Calendar)

ब्रजमध्ये होळीचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

२३ फेब्रुवारी (सोमवार): बरसाना लाडू होळी – श्रीजी मंदिरात लाडूंची उधळण करून या उत्सवाची गोड सुरुवात होते.

२४ फेब्रुवारी (मंगळवार): बरसाना लाठमार होळी – जगप्रसिद्ध लाठमार होळी, जिथे गोपी (महिला) नंदागावच्या गोपाळांवर प्रेमाने लाठ्या चालवतात.

२५ फेब्रुवारी (बुधवार): नंदागाव लाठमार होळी – दुसऱ्या दिवशी नंदागावमध्ये हाच उत्साह पाहायला मिळतो.

२७ फेब्रुवारी (शुक्रवार): रंगभरनी एकादशी – वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात रंगांची पहिली मोठी उधळण होते. याच दिवशी 'फुलांची होळी' (Phoolon ki Holi) साजरी केली जाते.

Lunar Eclipse 2026: चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून? कोणावर परिणाम? कशी घ्यावी काळजी; घ्या इत्थंभूत माहिती!

२८ फेब्रुवारी (शनिवार): गोकुळ छडीमार होळी – लहान मुलांसोबत (बालकृष्ण) खेळली जाणारी छडीमार होळी.

२ मार्च (सोमवार): होलिका दहन – संपूर्ण ब्रजमध्ये धार्मिक विधींनुसार होळी पेटवली जाते.

३ मार्च (मंगळवार): धुलिवंदन (रंगोत्सव) – मुख्य होळीचा दिवस, जिथे रंगांचा वर्षाव होतो.

७ मार्च (शनिवार): रंगपंचमी – ब्रज उत्सवाची सांगता रंगपंचमीने होते.

ब्रज होळीचे खास आकर्षण

१. लाठमार होळी: ही होळी राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक मानली जाते. नंदागावचे पुरुष बरसाण्यात येतात आणि तिथल्या महिला त्यांच्यावर लाठ्यांनी प्रहार करतात, पुरुष ढालीने स्वतःचा बचाव करतात.

२. फुलांची होळी: रंगभरनी एकादशीला नैसर्गिक फुलांच्या पाकळ्यांनी खेळली जाणारी ही होळी पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.

३. राधारानी आणि बांके बिहारी दर्शन: या काळात मंदिरांमध्ये होणारा गुलाल आणि अबिराचा वर्षाव भक्तांना मंत्रमुग्ध करतो.

ब्रज होळीला जाणाऱ्यांसाठी काही टीप्स:

वेळेचे नियोजन: गर्दी प्रचंड असल्याने प्रत्येक ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचणे सोयीचे ठरते.

सुरक्षा: डोळ्यांचे आणि त्वचेचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करा.

पांढरे कपडे: ब्रजमध्ये पांढरे कपडे घालून होळी खेळण्याची जुनी परंपरा आहे, त्यावर उडणारे रंग अधिक खुलून दिसतात.

Power of Mantra: रात्री झोपण्यापूर्वी म्हणा 'हा' मंत्र; दुःख, कष्ट होईल दूर, मंत्राचा लाभ होईल पुरेपूर!

Web Title : ब्रज होली 2026: मथुरा-वृंदावन में महीने भर का उत्सव; जानिए विवरण!

Web Summary : मथुरा-वृंदावन की ब्रज होली विश्व प्रसिद्ध है, जो एक महीने तक चलने वाला त्योहार है। इसकी शुरुआत लड्डू होली से होती है, जिसके बाद लठमार होली, फूलों की होली और रंगपंचमी मनाई जाती है। इसमें तिथियां, आकर्षण और सुझाव शामिल हैं।

Web Title : Braj Holi 2026: Month-long celebrations in Mathura-Vrindavan; Know the details!

Web Summary : Mathura-Vrindavan's Braj Holi is world-famous, a month-long festival. It starts with Laddu Holi, followed by Lathmar Holi, Phoolon ki Holi, and culminates with Rangpanchami. Includes dates, attractions and tips.