बाबा रामदेव सांगणार नैराश्य हटवणारा योग मंत्र, ‘लोकमत भक्ती’ चॅनलवर LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 21:41 IST2020-06-19T21:39:18+5:302020-06-19T21:41:40+5:30
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने लोकमतने आयोजित केलेल्या ‘योगायुग’ कार्यक्रमात बाबा रामदेव नैराश्य हटवण्यासाठी योग मंत्र देणार आहे.

बाबा रामदेव सांगणार नैराश्य हटवणारा योग मंत्र, ‘लोकमत भक्ती’ चॅनलवर LIVE
योगगुरू बाबा रामदेव जगभरात योगाभ्यासाचा प्रसार करत आहेत. योगविद्येचं महत्त्व पटवून देत आहेत. ऋषी मुनींच्या काळापासून चालत आलेली ही विद्या आज मानसिक, शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. कोरोना संकटाच्या काळात जनमानसाचं आयुष्यच ढवळून निघालं असताना योग साधना मोठा आधार ठरू शकते.
कोरोनामुळे निर्माण झालेलं नकारात्मक, निराशाजनक वातावरण दूर व्हावं यासाठी योगाभ्यास कसा लाभदायक ठरू शकतो, अस्वस्थता दूर करून मनःशांती देऊ शकतो का, याबाद्दल मार्गदर्शन करण्यासाठी खुद्द रामदेव बाबा आपल्या भेटीला येत आहेत.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने लोकमतने आयोजित केलेल्या ‘योगायुग’ कार्यक्रमात बाबा रामदेव नैराश्य हटवण्यासाठी योग मंत्र देणार आहे. ‘लोकमत भक्ती’ या यू ट्युब चॅनेलवर आणि लोकमतच्या फेसबुक पेजवर शनिवारी, २० जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांना LIVE पाहता येणार आहे. अस्वस्थता दूर होऊन डोकं शांत व्हावं यासाठी योगाभ्यासाची मदत कशी घेता येईल?, या विषयी ते सांगणार आहेत. हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका!