औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:46 IST2026-02-05T11:43:44+5:302026-02-05T11:46:30+5:30
Audumbara Panchami 2026: औदुंबर पंचमीचे महत्त्व, पूजा विधी आणि त्यामागील श्रद्धेवर आधारित सविस्तर माहिती जाणून घ्या.

औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी ही 'औदुंबर पंचमी(Audumbara Panchami 2026) म्हणून साजरी केली जाते. दत्त संप्रदायात या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण औदुंबर (उंबर) हे झाड भगवान दत्तात्रयांचे विश्रामस्थान मानले जाते. यंदा शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे. त्यादिवशी कोणते पूजा विधी करावेत, जेणेकरून दत्त गुरूंचा कृपाशिर्वाद राहील ते जाणून घेऊ.
संकष्ट चतुर्थी २०२६: तिजोरी कधीच रिकामी होणार नाही; संकष्टीला बाप्पाला अर्पण करा 'या' गोष्टी!
दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला साक्षात 'कल्पवृक्ष' मानले जाते. 'औदुंबर पंचमी' हा दिवस या पवित्र वृक्षाची उपासना करून गुरुचरणांशी एकरूप होण्याचा दिवस आहे. ज्या घराच्या किंवा मंदिराच्या परिसरात औदुंबर असतो, तिथे साक्षात श्रीदत्तात्रयांचा वास असतो अशी श्रद्धा आहे.
औदुंबर पंचमीचे आध्यात्मिक महत्त्व:
शास्त्रानुसार, औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू, मध्यभागी ब्रह्मा आणि अग्रभागी शिव राहतात. औदुंबराच्या सावलीत बसून केलेली साधना किंवा नामस्मरण हजार पटीने जास्त फळ देते. विशेषतः ज्यांना मानसिक शांती हवी आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत गुरु ग्रह कमकुवत आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी असतो.
औदुंबर पंचमी पूजा विधी:
१. शुद्धी: या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे.
२. वृक्ष पूजन: तुमच्या परिसरातील औदुंबर वृक्षापाशी जाऊन त्याची पूजा करा. जर वृक्ष उपलब्ध नसेल, तर औदुंबराच्या फांदीची किंवा दत्तात्रयांच्या फोटोची पूजा करू शकता.
३. अभिषेक: वृक्षाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, अष्टगंध आणि अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी.
४. दिवा आणि धूप: वृक्षाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी.
५. प्रदक्षिणा: औदुंबर वृक्षाला 'श्री गुरुदेव दत्त' किंवा 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या मंत्राचा जप करत किमान ७ किंवा २१ प्रदक्षिणा घालाव्यात.
६. नैवेद्य: बाप्पाला किंवा औदुंबराला खडीसाखर किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा.
Vastu Tips: घरात सतत कटकटी? एका ग्लास पाण्यात लवंग टाकून पाहा; कळेल धक्कादायक सत्य!
या दिवशी काय करावे?
गुरुचरित्र वाचन: औदुंबर पंचमीला गुरुचरित्रातील महत्त्वाच्या अध्यायांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते.
दानधर्म: गरीब आणि गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा वस्त्र दान करावे.
मौन साधना: काही वेळ शांत बसून गुरुंचे ध्यान करावे, यामुळे आत्मिक शक्ती वाढते.
Swapna Shastra: स्वप्नात दिसणाऱ्या विचित्र गोष्टींचा तुमच्या खऱ्या आयुष्याशी काय संबंध असतो?