Astrology: घरात सुख-समृद्धी टिकत नाहीये? तुळशीजवळ दिवा लावताना म्हणा 'हे' ३ चमत्कारीक मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:38 IST2026-01-02T15:36:53+5:302026-01-02T15:38:15+5:30
Astrology: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावतो, त्याबरोबर पुढील ३ मंत्र आठवणीने म्हणा आणि आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या.

Astrology: घरात सुख-समृद्धी टिकत नाहीये? तुळशीजवळ दिवा लावताना म्हणा 'हे' ३ चमत्कारीक मंत्र
हिंदू धर्मात दिवा हा 'ज्ञानाचा' आणि 'प्रकाशाचा' स्रोत मानला जातो. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना "दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी..." श्लोक म्हणत नमस्कार करण्याची आपली परंपरा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? दिवा लावताना जर आपण विशिष्ट ग्रहांचे स्मरण केले, तर आपल्या आयुष्यातील आर्थिक आणि शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.
वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार, दिवा लावताना खालील ३ मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते:
१. पैसा आणि समृद्धीसाठी: "ओम बृहस्पते नम:"
बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह. गुरु हा धन, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक आहे.
फायदा: दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने घरातील आर्थिक चणचण दूर होते. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात आणि घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो.
२. उत्तम आरोग्यासाठी: "ओम भौमाय नमः"
भौम म्हणजेच मंगळ ग्रह. मंगळ हा ऊर्जा, रक्त आणि शारीरिक शक्तीचा स्वामी आहे.
फायदा: या मंत्राच्या उच्चारणाने शरीरातील आळस दूर होऊन चैतन्य निर्माण होते. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीमध्ये संकटांशी लढण्याचे साहस निर्माण होते.
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
३. मन स्थिर करण्यासाठी: "ओम सोमाय नमः"
सोम म्हणजेच चंद्र देव. चंद्र हा आपल्या मनाचा आणि भावनांचा कारक आहे.
फायदा: आजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांत ठेवणे सर्वात कठीण आहे. हा मंत्र म्हटल्याने मानसिक ताण कमी होतो, मन स्थिर होते आणि रात्री शांत झोप लागते. ज्यांना विनाकारण चिंता वाटत असते, त्यांच्यासाठी हा मंत्र रामबाण आहे.
विधी कसा करावा?
संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान (प्रदोष काळात) घरात दिवा लावावा.
दिवा लावल्यानंतर हात जोडून शांत चित्ताने प्रत्येकी किमान ३ किंवा ११ वेळा या मंत्रांचा जप करावा.
दिव्याची ज्योत शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी.
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब