Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:09 IST2025-12-25T13:08:18+5:302025-12-25T13:09:55+5:30
Astrology: नवे वर्ष उंबरठ्यावर असताना ते उत्तम जावे, यासाठी सरत्या वर्षात पुढील ३ गोष्टी जरूर करा, त्याचा लाभ भविष्यात होईल.

Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
वर्ष २०२५ निरोप घेत असून २०२६ चे वेध सर्वांना लागले आहेत. नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुप्रसिद्ध ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांच्या मते, नवीन वर्षात केवळ नशिबावर अवलंबून न राहता योग्य नियोजन आणि आध्यात्मिक जोड दिल्यास मोठे यश संपादन करता येते.
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
त्यांनी सुचवलेले ३ प्रभावी उपाय आणि यशाची त्रिसूत्री खालीलप्रमाणे आहे:
१. यशाचा पाया:
'उत्तम प्लॅनिंग' (५०% यश इथेच आहे!)
शिरीष कुलकर्णी म्हणतात की, २०२६ चा एक उत्तम प्लॅन (नियोजन) तयार करा. जर तुम्ही तुमच्या ध्येयांचे योग्य नियोजन केले, तर तुमचे ५० टक्के काम तिथेच पूर्ण होते. उरलेले ५० टक्के यश मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ त्या प्लॅनवर कठोर मेहनत घ्यायची आहे. ज्याचे नियोजन पक्के, त्याचे यश नक्की, हा २०२६ चा मूळ मंत्र आहे.
२. वर्षाअखेरची आध्यात्मिक पूर्वतयारी (व्यंकटेश स्तोत्र)
नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःच्या उर्जेचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी एक विशेष उपाय सांगितला आहे.
कधी करायचा: ३१ डिसेंबरच्या आधीचे सलग ३ दिवस.
उपाय: रात्री झोपण्यापूर्वी ११ वेळा 'व्यंकटेश स्तोत्र' म्हणा किंवा ऐका.
फायदा: यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन श्री व्यंकटेश भगवंताच्या कृपेने नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि अडथळामुक्त होते.
३. नित्य साधना: सूर्योपासना आणि आदित्य हृदय स्तोत्र
२०२६ मध्ये वर्षभर सातत्याने करायचा हा उपाय तुमच्या आत्मविश्वासात आणि आरोग्यात भर घालेल:
रोज सकाळी सूर्याला नमस्कार करा. कारण, सूर्य हा ऊर्जेचा आणि यशाचा कारक आहे.
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
त्याबरोबरच, 'आदित्त्य हृदय' स्तोत्र ऐका: रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा अंघोळीनंतर 'आदित्य हृदय स्तोत्र' ऐकल्याने तेज वाढते आणि कोर्ट-कचेरी किंवा नोकरीतील समस्या दूर होतात.
पाहा व्हिडीओ -