Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:26 IST2025-11-12T17:25:01+5:302025-11-12T17:26:05+5:30

Astro Tips: औदुंबर हे दत्त गुरुंचे निवासस्थान, औदुंबराला आपण प्रदक्षिणा तर घालतोच, पण त्याचे फायदेही जाणून घ्या.

Astro Tips: You will be amazed to read the spiritual and medical benefits of pouring water on Audumbara every Thursday! | Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

गुरुवार हा दत्त गुरूंचा आणि त्यांचा शोध घ्यायचा असेल तर कोणतेही औदुंबराचे झाड गाठावे असे म्हणतात, कारण ते त्यांचे निवासस्थान समजले जाते. अशा औदुंबराला पाणी घालण्याचे अनेक लाभ आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!

सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी, वड, शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे. असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात. या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे. त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो.  

विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला. 

या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 

Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास  किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो. यासोबतच पैशांशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तविक, शुक्र हा संपत्ती आणि ऐषोआरामाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो, त्याला धन आणि ऐश्वर्य यांची कधीही कमतरता नसते. पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो, तिथे दारिद्रय, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. चला तर मग आज जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय, जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील.

शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी: उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. 'ओम शम शुक्राय नमः' या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते. दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते. 

समृद्धीसाठी उपाय : शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे. ११ प्रदक्षिणा घालाव्यात. या झाडाखाली बसून 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' या मंत्राचा जप करावा. घरात सुख शांती राहते. 

Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर

ज्योतिष शास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन-संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका. 

मानसिक स्वास्थ्यासाठी : रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन-नामःस्मरण करा. महिनाभरात तुम्हाला मनःस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल. मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सान्निध्य सर्वार्थाने चांगले आहे. 

Web Title : ज्योतिषीय उपाय: औदुंबर के पेड़ को पानी देने के आध्यात्मिक और चिकित्सीय लाभ।

Web Summary : औदुंबर के पेड़ को, खासकर गुरुवार को, पानी देने से कुंडली में शुक्र मजबूत होता है। यह धन लाता है, प्रेम में बाधाओं को दूर करता है, संपत्ति के मुद्दों में मदद करता है, और ध्यान के माध्यम से मानसिक स्वास्थ्य में सुधार करता है। इसे भगवान दत्तात्रेय का निवास माना जाता है।

Web Title : Astro Tips: Spiritual and medical benefits of watering Audumbar tree.

Web Summary : Watering the Audumbar tree, especially on Thursdays, strengthens Venus in your horoscope. It brings wealth, removes obstacles in love, helps with property issues, and improves mental health through meditation. It’s considered the abode of Lord Dattatreya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.