Astro Tips: साडेसाती असो वा नसो, शनिवारी सायंकाळी केलेले 'हे' उपाय देतात लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 07:05 IST2025-11-22T07:01:00+5:302025-11-22T07:05:01+5:30
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील ग्रहस्थिती चांगली ठेवण्यासाठी शनिकृपा हवी आणि ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे पुढे दिलेले उपाय!

Astro Tips: साडेसाती असो वा नसो, शनिवारी सायंकाळी केलेले 'हे' उपाय देतात लाभ!
शनि अर्थात संथ! नवग्रहातील हा ग्रह शांततेत भ्रमण करणारा पण प्रत्येक ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत पुढे जाणारा. त्यात शनी देव ही न्यायाची देवता. ज्याठिकाणी मुक्काम करणार, त्या व्यक्तीचे सगळे कार्य तपासून त्याला उशिरा का होईना पण कर्मानुसार फळ देणार. म्हणून आपले आचरण शुद्ध ठेवत शनिकृपा व्हावी म्हणून ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
नवग्रहांमध्ये शनिवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण शनिवार हा शनिदेवाचा वार. त्यांची कृपादृष्टी असेल तर आयुष्यातील अनेक अडचणींना लढायचे बळ मिळते. शनी देवाला मनुष्याचा प्रामाणिकपणा, दानधर्म, नम्रता आणि सेवाभाव विशेष आवडतो. या सवयींबरोबर पुढील उपाय केले असता अडचणीतून मार्ग निघतो. यासाठी शनिवारी सायंकाळी पुढील उपाय करा. आर्थिक अडचणी, नोकरी-व्यवसायातील अडथळे, आरोग्याच्या समस्या इत्यादींवर मात करण्यासाठी शनिवारचे हे उपाय देखील खूप प्रभावी आहेत.
>>शनिवारी संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तेलात थोडे काळे तीळ टाका. या दोन्ही गोष्टी शनिदेवाला प्रिय आहेत.
>>शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात. हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय काही शनिवार सातत्याने केल्यास परिणाम दिसून येतो.
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
>>शनिदेवाला लोबान अतिशय प्रिय आहे. शनिवारी रात्री घरामध्ये धूप जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील कलह संपतो. घरातील लोकांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो, घरात पैशाची आवक वाढते आणि आरोग्यही चांगले राहते.
>>शनिदेवाला श्वान प्रिय आहे. त्यामुळे दररोज जेवणाआधी आणि विशेषतः शनिवारी कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. यामुळे शनिदेवाची कृपा तर मिळेलच, पण कुंडलीत राहू-केतू दोष असतील तर तेही दूर होतील.
>>शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पंचदिप लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात धन, कीर्ती आणि वैभवाची कमतरता नसते.
>>शनिवारी हनुमंताची पूजा केल्यानेदेखील शनिदेव प्रसन्न होतात. हनुमान चालीसा तसेच नवग्रह स्तोत्राचे शनिवारी पठण केल्यास विशेष लाभ होतो.