Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:27 IST2026-01-02T10:26:13+5:302026-01-02T10:27:37+5:30
Astro Tips: कुंडलीतील अग्नी तत्त्व बलवान असेल आणि आपल्या कष्टात ऊर्जा असेल तर ज्योतिष शास्त्रात पुढे दिलेल्या उपायाचा पुरेपूर लाभ होईल.

Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
यश मिळवण्यासाठी केवळ कष्ट असून चालत नाही, तर नशिबाची आणि ग्रहांची साथही आवश्यक असते. ज्योतिष शास्त्रानुसार, ज्याच्या कुंडलीत रवी (सूर्य) आणि मंगळ हे दोन ग्रह बलवान असतात, तो व्यक्ती आयुष्यात कधीही मागे पडत नाही. २०२६ हे वर्ष 'सूर्याचे' वर्ष मानले जात असल्याने, या वर्षात सूर्य आणि मंगळाची उपासना करणे विशेष फलदायी ठरेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांनी केले आहे.
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
२०२६: सूर्याचे वर्ष आणि उपासना
२०२६ या वर्षाच्या अंकाची बेरीज (२+०+२+६ = १०; १+० = १) एक येते. '१' हा अंक सूर्य ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या संपूर्ण वर्षात सूर्याची कृपा मिळवणे प्रगतीसाठी अनिवार्य आहे.
नित्य उपासना: रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करा.
आदित्य हृदय स्तोत्र: जर तुम्हाला स्तोत्र पठण करणे शक्य नसेल, तर रोज सकाळी 'आदित्य हृदय स्तोत्र' ऐकण्यास सुरुवात करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कामात यश मिळते.
शास्त्रानुसार महिन्यातून एकदाच शरीर संबंधाला अनुमती; ते खरं सांसारिक ब्रह्मचर्य - प्रेमानंद महाराज
मंगळ बलवान करा आणि अडथळे दूर करा
मंगळ हा साहस आणि ऊर्जेचा स्वामी आहे. मंगळ कमकुवत असेल तर कामात आळस येतो आणि वारंवार अडथळे येतात. मंगळाला प्रसन्न करण्यासाठी शिरीष कुलकर्णी यांनी खालील उपाय सुचवला आहे:
मंगळवारचा विधी: महिन्यातून किमान एका मंगळवारी जवळच्या शेंदरी हनुमानाच्या (मारुती) मंदिरात जा.
अर्पण: मारुती रायाला बुंदीचा लाडू आणि लाल कापडाचा तुकडा/रुमाल अर्पण करा.
फायदा: या उपायामुळे कुंडलीतील मंगळ दोष शांत होतो, जमिनीशी संबंधित व्यवहार मार्गी लागतात आणि शत्रूंवर विजय मिळवता येतो.
या उपायांचे एकत्रित परिणाम
जेव्हा रवी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह शुभ फल देऊ लागतात, तेव्हा व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते, आरोग्य उत्तम राहते आणि करिअरमध्ये मोठी झेप घेता येते. विशेषतः ज्यांना नोकरीत बढती हवी आहे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी २०२६ हे वर्ष 'गोल्डन' ठरू शकते. पाहा त्यांचा व्हिडीओ -