Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:20 IST2025-11-18T17:17:19+5:302025-11-18T17:20:04+5:30
Astro Tips: २०२६ हे सूर्याचे वर्ष आहे आणि सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, त्याच्यासारखे तुमचेही आयुष्य तेजोमय व्हावे म्हणून दिलेला उपाय करा.

Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
प्रत्येकाला जीवनात यश, सत्ता आणि समृद्धीचे राजेशाही जीवन जगण्याची इच्छा असते. अंकशास्त्र आणि गूढ शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, २०२६ हे वर्ष सुरू होण्यापूर्वी एक अत्यंत प्रभावी आणि रहस्यमय उपाय सांगितला जातो, जो तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा करू शकतो आणि तुम्हाला राजा होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही! कारण २०२६(New Year 2025) या वर्षाचा मूलांक आहे १ आणि १ हा मूलांक ग्रहांचा राजा सूर्य याच्याकडे निर्देश करतो. त्यामुळे आगामी वर्ष इच्छापूर्ती करणारे ठरू शकते. त्यासाठी पुढील उपाय करा.
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
भाग्योदयासाठी 'वसुधा चिन्हा'चा उपाय :
सर्वप्रथम, स्वस्तिकाप्रमाणे दिसणारे 'वसुधा चिन्ह' असलेले एक आकर्षक चित्र किंवा फोटो प्रिंट करून घ्या. (हे चिन्ह समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते.)
या वसुधा चिन्हाच्या चित्राच्या मागील बाजूस (पाठीमागे) तुमची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण इच्छा स्पष्ट शब्दांत लिहा.

हे चित्र एका काळया फ्रेममध्ये (Black Frame) व्यवस्थित चिकटवून किंवा बसवून घ्या. काळा रंग नकारात्मक शक्तींना दूर ठेवून ऊर्जेचे संतुलन राखण्यास मदत करतो.
फ्रेम केलेले हे चित्र तुमच्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर (East Wall) योग्य उंचीवर लावा. पूर्व दिशा ही सूर्य आणि ऊर्जेची दिशा मानली जाते, जी यश आणि नवीन सुरुवात दर्शवते.
प्रयत्नांना सुरुवात करा
हा उपाय केवळ चित्र लावून थांबत नाही. तुम्ही जेव्हा हे 'वसुधा चिन्ह' घरात स्थापित कराल, त्याच क्षणापासून तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि राजेशाही जीवन जगण्यासाठी प्रयत्न सुरू करा.
या चिन्हाची ऊर्जा आणि तुमच्या कृती यांची योग्य सांगड घातल्यास, अंकशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते, तुमच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार नाही. पाहा ज्योतिषी राहुल यांचा हा व्हिडीओ -