Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:25 IST2025-10-10T17:24:12+5:302025-10-10T17:25:41+5:30
Business Prosperity Remedy Astro Tips: व्यवसाय करणे, वाढवणे सोपे नाही, त्यात यश मिळवण्यासाठी अथक प्रयत्नाबरोबर लागते नशिबाची साथ, त्यासाठी हा ज्योतिष उपाय.

Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
व्यवसायात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य धोरणे आवश्यक असली तरी, अनेकदा नशीब आणि सकारात्मक ऊर्जा यांची साथ मिळणेही महत्त्वाचे ठरते. काहीवेळा, व्यवसायाच्या ठिकाणी जाणवणारी नकारात्मक ऊर्जा किंवा दृष्ट लागणे (Evil Eye) यामुळे भरभराटीत अडथळे येतात.
तुमचा व्यवसाय मंदावला असेल किंवा अपेक्षित प्रगती होत नसेल, तर तीन शनिवार करायचा एक अत्यंत प्रभावी आणि साधा उपाय ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांनी दिला आहे. हा उपाय तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर करून धन आणि ग्राहकांना आकर्षित करतो.
तीन शनिवार करायचा अचूक उपाय : हा उपाय व्यवसायाच्या ठिकाणी (दुकान किंवा कार्यालय) करायचा आहे. घरून व्यवसाय करत असाल तरी तुमच्या कार्यस्थळी तुम्हाला हा उपाय करता येईल. तुम्हाला केवळ तीन सलग शनिवार हा विधी करावा लागेल.
उपाय करण्याची पद्धत:
वेळ आणि ठिकाण: शनिवारी संध्याकाळच्या वेळी, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी (दुकान किंवा ऑफिस) शांतपणे उभे राहा.
तुमच्या मुठीत मावेल एवढी पिवळी मोहरी (Yellow Mustard Seeds) घ्या. पिवळी मोहरी ही समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्वाची मानली जाते.
हातात मोहरी घेऊन, तुम्ही देवी वाराही देवीच्या नामाचा (Maa Varahi) मंत्र उच्चारायचा आहे - ओम वाराही देव्यै नम:।
हा मंत्र अकरा (११) वेळा पूर्ण श्रद्धेने म्हणायचा आहे.
मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर, ती मोहरी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणावरून बाहेर (म्हणजे रस्त्यावर किंवा बाहेर अडगडीच्या जागेत) टाकून द्यायची आहे.
उपाय करण्याचे महत्त्व :
देवी वाराही ही अडथळ्यांचा आणि शत्रूंचा नाश करणारी मानली जाते. पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा आणि वाईट दृष्ट (बुरी नजर) दूर करण्यासाठी वापरली जाते. शनिवारी हा उपाय केल्याने शनिदेवाचे (जे कर्म आणि न्यायाचे देव आहेत) आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे तुमच्या व्यवसायातील सर्व कर्मजन्य अडथळे दूर होतात.
हा उपाय सलग तीन शनिवार केल्यास, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, ग्राहकांची संख्या वाढते आणि आर्थिक वाढ दिसून येते. पूर्ण श्रद्धा आणि स्वच्छ मनाने हा उपाय करा, तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील. पहा व्हिडिओ -