Astro Tips: आषाढ गुप्त नवरात्रीत अविवाहित मुला-मुलींनी करा 'हे' उपाय; वैवाहिक अडचणी होतील दूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:03 IST2024-07-08T16:01:44+5:302024-07-08T16:03:26+5:30
Marriage Astro Tips: ६ जुलै रोजी आषाढ गुप्त नवरात्र सुरू झाली आहे, या नऊ दिवसात गुप्तपणे केलेली उपासना लवकर फळते!

Astro Tips: आषाढ गुप्त नवरात्रीत अविवाहित मुला-मुलींनी करा 'हे' उपाय; वैवाहिक अडचणी होतील दूर!
वर्षभरात एकूण तीन नवरात्र येतात. चैत्र, शारदीय आणि शाकंभरी! याव्यतिरिक्त गुप्त नवरात्रही असते. ज्या काळात गुप्त उपासना केली जाते. थोडक्यात आपल्या भक्तीचे प्रदर्शन न करता देवाला मनोभावे साद घाला हे सांगणारी गुप्त नवरात्र! तंत्रविद्या आणि काही विशेष उपासनेसाठी हा पवित्र काळ अतिशय शुभ मानला जातो. विवाहेच्छुकांसाठी या कालावधीत करता येतील असे उपाय ज्योतिष शास्त्राने सुचवले आहेत.
सद्यस्थितीत विवाह ठरण्यात आणि ठरलेला विवाह टिकवण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्याला कारणं वेगवेगळी असली तरी त्यातून मार्ग काढून सुखी संसार करावा असा प्रत्येकाचा मानस असतो आणि प्रयत्नही! त्यासाठीच आषाढात येणाऱ्या गुप्त नवरात्रीत काही प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केले असता विवाहेच्छुक मुलं मुलींना लग्न ठरण्यात आणि ठरलेले लग्न टिकवण्यात अडचणी येत नाहीत आणि सुखी संसाराचा मार्ग निष्कंटक होतो. चला पाहूया ज्योतिष शास्त्रीय तोडगे!
अविवाहित मुलींसाठी उपाय :
ज्या मुलींची लग्ने होत नाहीत त्यांनी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये सकाळी पाण्यात हळद टाकून स्नान करावे. यानंतर जमिनीवर आसन घालून बसावे. उत्तरेकडे तोंड करून देशी तुपाचा दिवा लावा. मग माता कात्यानी मातेचा पुढे दिलेला मंत्र म्हणावा -
महामाये महायोगिन्यधीश्वरी। नन्दगोपसुतं देवी, पति मे कुरु ते नमः।।
यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथीही मिळेल.
अविवाहित पुरुषांसाठी उपाय :
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या पुरुषांचे लग्न होत नाही त्यांनी गुप्त नवरात्रीमध्ये कुलदेवीची रोज पूजा करावी. तसेच पुढील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्। तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्
या उपासनेमुळे योग्य वधू मिळण्यास मदत होईल. तसेच विवाहाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.