शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: सकाळी 'या' ५ झाडांचे दर्शन घेणे ठरते शुभ; लक्ष्मीच्या कृपेने होतो धनलाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:05 IST

Astro Tips: मॉर्निंग वॉक अर्थात प्रभात फेरी केवळ आरोग्य दृष्ट्या नाही तर ज्योतिष दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे, तेव्हाच तर पुढील पाच झाडांचे दर्शन होईल. 

हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना केवळ नैसर्गिकच नव्हे, तर धार्मिक महत्त्व आहे. काही झाडे अशी आहेत, ज्यात साक्षात देवी-देवतांचा वास असतो, अशी मान्यता आहे. म्हणूनच सकाळी लवकर उठून 'या' ५ पवित्र झाडांचे दर्शन घेतल्यास माता लक्ष्मीची विशेष कृपा होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!

१. पिंपळाचे झाड (Peepal Tree)धार्मिक महत्त्व: पिंपळाच्या झाडात साक्षात भगवान विष्णू यांचा वास असतो, असे मानले जाते.

फायदे: सकाळी या झाडाचे दर्शन घेतल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची कृपा एकत्र प्राप्त होते. तसेच, दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी पिंपळाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात सुख-शांती येते.

२. शमीचे झाड (Shami Tree)धार्मिक महत्त्व: शमीच्या झाडाची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात.

फायदे: रोज सकाळी शमीच्या झाडाचे दर्शन घेतल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांची क्रूर दृष्टीचा प्रभाव जाचकाला जाणवत नाही. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळते आणि तुमचे घर धनाने भरलेले राहते.

३. बेलपत्राचे झाड (Belpatra Tree)धार्मिक महत्त्व: बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे आणि ते अतिशय पूजनीय मानले जाते.

फायदे: ज्या घरात बेलपत्राचे झाड असते, तिथे कधीही गरिबी येत नाही. घरात रोग, अडथळे किंवा मोठे नुकसान होत नाही. अशा घरात माता लक्ष्मीचा वास कायम असतो. सकाळी बेलपत्राचे दर्शन घेतल्यास तुमचा दिवस शुभ ठरतो.

दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 

४. आवळ्याचे झाड (Amla Tree)धार्मिक महत्त्व: धार्मिक मान्यतेनुसार, आवळ्याच्या झाडात देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण (विष्णू) यांचा वास असतो.

फायदे: दररोज सकाळी आवळ्याच्या झाडाचे केवळ दर्शन घेतल्यास आपले भाग्य (नशीब) जागृत होते. संध्याकाळच्या वेळी आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्यास घरात धन-संपदा आणि सुख वाढते.

५. वडाचे झाड (Banyan Tree)धार्मिक महत्त्व: वटवृक्षात (वड/बरगद) त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो, असे मानले जाते.

फायदे: अखंड सौभाग्य आणि आरोग्य प्राप्तीसाठी भक्त वडाच्या झाडाची पूजा करतात. सकाळी या पवित्र वडाच्या झाडाचे दर्शन घेतल्यास जीवनातील सर्व कष्ट दूर होतात आणि सकारात्मकता वाढते.

सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!

अशा प्रकारे, हिंदू धर्मात या पवित्र झाडांचे दर्शन घेणे हे केवळ धार्मिक नाही, तर घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी एक शुभ माध्यम मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Astro Tips: Seeing these 5 trees in the morning brings wealth.

Web Summary : Hinduism values certain trees as divine. Seeing Peepal, Shami, Belpatra, Amla, and Banyan trees blesses one with Lakshmi's grace, bringing prosperity and happiness to the home.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषNatureनिसर्ग