असे म्हणतात की, "प्रयत्नांती परमेश्वर", पण अनेकदा खूप कष्ट करूनही यश हुलकावणी देते. अशा वेळी आपल्या कुंडलीतील सूर्य, गुरू आणि शुक्र या तीन प्रमुख ग्रहांचे पाठबळ मिळणे आवश्यक असते. सूर्य आपल्याला तेज आणि पद-प्रतिष्ठा देतो, गुरू भाग्याची साथ देतो, तर शुक्र जीवनात सुख-समृद्धी आणि सौंदर्य आणतो.
Jaya Ekadashi 2026: जया एकादशी ठरणार 'या' राशींसाठी टर्निंग पॉईंट! जाणून घ्या तुमचं भविष्य!
ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार, तुमच्या कर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून देण्यासाठी खालील ३ उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. हे उपाय केवळ धार्मिक नसून ते आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणणारे आहेत. कष्टाला जेव्हा नशिबाची आणि ग्रहांची जोड मिळते, तेव्हा यशाचा मार्ग सुखकर होतो.
१. सूर्याचे तेज: कर्तृत्वाला झळाळी मिळवण्यासाठी
सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जर तुमचा आत्मविश्वास कमी पडत असेल किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ओळख मिळत नसेल, तर सूर्य बलवान करणे आवश्यक आहे.
उपाय: रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला नमस्कार करा. शक्य असल्यास तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्या.
फायदा: यामुळे आत्मबळ वाढते आणि समाजात तुमच्या कर्तृत्वाला नवी झळाळी मिळते.
२. गुरूची कृपा: भाग्याची साथ मिळवण्यासाठी
गुरू ग्रह प्रबळ असेल तरच कष्टाचे फळ भाग्याच्या रूपात मिळते. गुरू हा ज्ञान आणि प्रगतीचा कारक आहे.
उपाय: दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. झाडाला मनोभावे ११, २१ किंवा १०८ प्रदक्षिणा घाला. पिंपळामध्ये ईश्वरी तत्त्व मानले जाते, त्यामुळे या प्रदक्षिणांमुळे जीवनातील अडथळे दूर होतात.
फायदा: रखडलेली कामे मार्गी लागतात आणि नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते.
३. शुक्राचे बळ: सुख-समृद्धी आणि व्यक्तिमत्त्वासाठी
शुक्र ग्रह हा ऐश्वर्य, सौंदर्य आणि आनंदाचा कारक आहे. शुक्र बलवान असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडतो.
उपाय: रोज अंघोळीच्या पाण्यात एक चमचा गुलाब जल टाकून स्नान करा.
नेहमी नीटनेटके, स्वच्छ कपडे परिधान करा.
सुगंधाचा (अत्तर किंवा पर्फ्युम) वापर करा.
हातात चांदीचे कडे किंवा ब्रेसलेट वापरा.
फायदा: यामुळे तुमची आकर्षण शक्ती वाढते आणि जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते. पाहा लेखाच्या शेवटी दिलेला व्हिडिओ!
मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात...
टीप: हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि अपेक्षित फळ मिळेपर्यंत सातत्याने करत राहणे आवश्यक आहे. कष्टाची तयारी आणि या उपायांची जोड तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास नक्कीच मदत करेल.
Web Summary : Hard work sometimes falls short. Astrological remedies involving the Sun, Jupiter, and Venus can boost luck. These simple practices enhance confidence, fortune, and overall well-being.
Web Summary : कड़ी मेहनत कभी-कभी कम पड़ जाती है। सूर्य, बृहस्पति और शुक्र से जुड़े ज्योतिषीय उपाय भाग्य को बढ़ावा दे सकते हैं। ये सरल अभ्यास आत्मविश्वास, भाग्य और समग्र कल्याण को बढ़ाते हैं।