Astro Tips: सुखी वैवाहिक जीवन आणि करिअर यश: ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी करा 'हे' प्रभावी तोडगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 07:05 IST2026-03-13T07:00:01+5:302026-03-13T07:05:01+5:30

Astro Tips: शुक्रवार हा देवीचा वार आणि देवी ही आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी माता आहे, यासाठी ज्योतिष शास्त्रात शुक्रवारचे प्रभावी तोडगे सांगितले जातात.

Astro Tips: Happy married life and career success: According to astrology, do 'these' effective solutions on Friday. | Astro Tips: सुखी वैवाहिक जीवन आणि करिअर यश: ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी करा 'हे' प्रभावी तोडगे

Astro Tips: सुखी वैवाहिक जीवन आणि करिअर यश: ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी करा 'हे' प्रभावी तोडगे

तुमचे वैवाहिक जीवन केवळ तुमच्या वैयक्तिक सुखाशीच नाही, तर तुमच्या करिअरच्या यशाशीही जोडलेले असते, हे तुम्हाला माहीत आहे का? एका ताज्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, ज्यांचे घरगुती जीवन स्थिर आणि आनंदी असते, ते लोक आपल्या कामात अधिक प्रगती करतात.

Numerology: ना दागिन्यांची गरज, ना महागड्या कपड्यांची; तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतात 'या' जन्मतारखेचे लोक!

आजच्या काळात लग्न जुळवणे आणि ते टिकवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. नातेवाईकांचे टोमणे आणि मनासारखा जोडीदार न मिळणे यामुळे अनेक तरुण-तरुणी तणावात असतात. जर तुम्हीही अशा समस्यांशी झुंजत असाल, तर ज्योतिषशास्त्राने सांगितलेले हे काही प्रभावी तोडगे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.

सुखी वैवाहिक जीवन आणि करिअरचे यश: ज्योतिषीय उपाय

तुमच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी आणि लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी खालील उपाय अत्यंत फलदायी ठरतात:

१. वैवाहिक कलह दूर करण्यासाठी (शुक्रवारी करायचा उपाय)

जर तुमच्या संसारात विनाकारण वाद होत असतील, तर शुक्रवारी मातीच्या दिव्यात कापराचे दोन तुकडे टाकून तो प्रज्वलित करा. हा दिवा संपूर्ण घरात फिरवा आणि नंतर घराबाहेर ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

Swami Samartha: गुरु ग्रह मार्गस्थ झाल्याने अनेकांचे प्रश्न सुटतील; पण स्वामी समर्थ परीक्षा नक्कीच घेतील!

२. जोडीदाराच्या आरोग्यासाठी दान

जर तुमच्या जोडीदाराची तब्येत वारंवार बिघडत असेल, तर प्रत्येक शुक्रवारी कोरडा शिधा (कणीक, डाळ, तांदूळ, गूळ) गरजू व्यक्तीला दान करा. गरीबांचे आशीर्वाद तुमच्या घरातील आजारपण दूर करण्यास मदत करतात.

३. घरात सुख-शांती नांदण्यासाठी ओटी भरा

घरातील सततची भांडणे थांबवण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करा आणि खणा-नारळाने ओटी भरा. एखाद्या गरजू महिलेला अन्न किंवा पैसे दान केल्याने देवीच्या आशीर्वादाने घरात शांतता टिकून राहते.

Gudi Padwa 2026: गुढीचा रंग बदलणार तुमचं भाग्य! जाणून घ्या कोणत्या रंगाचे वस्त्र घरामध्ये आणेल सकारात्मक ऊर्जा

लग्नाळू मुला-मुलींसाठी विशेष तोडगे (लवकर विवाह होण्यासाठी)

ज्यांचे लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत किंवा जोडीदार शोधत आहेत, त्यांच्यासाठी खालील उपाय प्रभावी आहेत:

शुक्राचार्यांचा मंत्र: चांगला जीवनसाथी मिळवण्यासाठी शुक्रवारी देवी आणि हनुमानाची उपासना करा. त्यानंतर शुक्राचार्यांच्या या मंत्राचा १०८ वेळा जप करा:

'ॐ द्रं द्रीं द्रौंस: शुक्राय नमः'

सूर्याला अर्घ्य: रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून तांब्याच्या पेल्यातून सूर्याला पाणी (अर्घ्य) द्या. सूर्याची १२ नावे घेत हे पाणी ताम्हनात सोडा आणि नंतर ते तुळशीला अर्पण करा.

लेकीसाठी खास उपाय: मुलगी लग्नानंतर सुखी राहावी यासाठी, तिच्या पाठवणीच्या वेळी किंवा ती माहेरी आल्यावर तिच्यावरून तांब्याभर पाणी ओवाळून ते आड रस्त्यावरील झाडाला टाकावे.

 

Web Title : ज्योतिष उपाय: सुखी वैवाहिक जीवन और करियर में सफलता के लिए शुक्रवार के टोटके

Web Summary : शुक्रवार के उपायों से वैवाहिक जीवन और करियर को मजबूत करें। कपूर से विवाद दूर करें, स्वास्थ्य के लिए दान करें, और शांति के लिए देवी की पूजा करें। विवाह के लिए शुक्राचार्य मंत्र और सूर्य को जल अर्पित करें।

Web Title : Astro Tips: Happy Marriage & Career Success with Friday Remedies

Web Summary : Strengthen marital bliss and career through Friday rituals. Resolve conflicts with camphor, donate to the needy for health, and worship Goddess for peace. For marriage prospects, chant Shukracharya mantra and offer water to Sun.