Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:18 IST2025-10-09T18:15:59+5:302025-10-09T18:18:28+5:30
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्रीच्या मुहूर्तावर निर्माण होणार आहे अशी एक सकारात्मक ऊर्जा जी तुमच्या अडचणी दूर करून इच्छापूर्ती करेल; त्यासाठी हा उपाय...!

Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो हे आपण ऐकलेच आहे आणि नशिबाची साथ व अथक प्रयत्नांनी आपल्याला त्या संधीचे सोनेदेखील करता येते. मात्र काही तिथी, मुहूर्त इतके शुभ असतात की त्या क्षणी केलेली उपासना, उपाय, तोडगे अधिक लाभ देतात.
ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी त्यांच्या व्हिडीओ मधून १० ऑक्टोबर संदर्भात इच्छापूर्तीचा एक उपाय सुचवला आहे. ते म्हणतात, या दिवशी एक सकारात्मक ऊर्जा रात्री १० वाजून १० मिनिटांनी निर्माण होणार आहे, जी तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. हा मुहूर्त गाठून कोणता उपाय करायचा आहे तेही जाणून घेऊ.
१० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून १० मिनिटांनी :
तुमची एखादी तीव्र इच्छा जी पूर्ण व्हावी असे वाटते, ती इच्छा त्या क्षणी पूर्ण झाली आहे याची कल्पना करा.
ते कल्पनाचित्र अनुभवून दहा वेळा येस, हो, इच्छा पूर्ण झाली असे सकारात्मक संदेश मोठ्याने म्हणा.
वैश्विक शक्तीपर्यंत तुमची इच्छा पोहोचेल आणि येत्या काळात इच्छापूर्तीसाठी ऊर्जाही मिळेल.
हा फॉर्म्युला काम कसा करणार?
तर १० या अंकामध्ये १ म्हणजे सुरवात आणि ० म्हणजे अनंत संधी, त्यामुळे १० तारखेचा १० वाजून १० मिनिटांचा मुहूर्त तुमच्यासाठी अनंत संधी घेऊन येणार ठरेल असे व्यास सांगतात. पहा त्यांचा व्हिडीओ.