Astro Tips: स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी करा 'ही' छोटाशी कृती; आजारपण आणि आर्थिक समस्येतून मिळेल मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:48 PM2024-04-18T15:48:46+5:302024-04-18T15:49:01+5:30

Astro Tips: अनेकांच्या घरात आजारपण निघण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे पुष्कळ पैसाही खर्च होतो; त्यासाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेला छोटासा उपाय रोज करा!

Astro Tips: Before you start cooking, do 'this' little trick; Get rid of illness and financial problems! | Astro Tips: स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी करा 'ही' छोटाशी कृती; आजारपण आणि आर्थिक समस्येतून मिळेल मुक्ती!

Astro Tips: स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी करा 'ही' छोटाशी कृती; आजारपण आणि आर्थिक समस्येतून मिळेल मुक्ती!

घरात एक व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजारपण येतं. अशा स्थितीत घरातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं. औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच! यासाठीच ज्योतिष शास्त्राने एक प्रभावी उपाय सुचवला आहे. त्याचा उपयोग रोज करा. दिलेला उपाय सलग महिनाभर केल्याने घरातील आजारपण दूर होण्यास मदत होते. 

>>यासाठी रोज सकाळी आपल्या किचनमधल्या शेगडीखाली दोन बोटं रांगोळी काढावी. 
>>फुल असेल तर, अन्यथा हळद कुंकू वाहून मगच शेगडीचा वापर सुरु करावा. 
>>तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा. 
>>मगच शेगडीचा वापर सुरु करावा. 

हा उपाय कशासाठी? 

तर शेगडीचा संबंध थेट अग्नीशी आहे. अग्नी शांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरतो, बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यही चांगले राहते. म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरु करावा. तसेच स्वयंपाकात पोळी, भाजी किंवा तत्सम पदार्थ केल्यावर त्याचा एक घास नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवावा. त्यामुळे अग्नी तृप्त होतो आणि पर्यायाने आरोग्यही चांगले राहते व आर्थिक नुकसान टळते. 

आपल्या आई-आजीने हे उपाय करताना, शेगडीची पूजा करताना, चूल सारवून रांगोळी काढताना आपण पाहिले, ऐकले असेल. या छोट्याशा उपचारामुळे त्याकाळात घरात आजाराचे प्रमाण कमी होते. कालौघात आधुनिक किचन करण्याच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली आणि रोगराई ओढवून घेतली. म्हणून पुन्हा नव्याने त्या उपायांचा वापर करूया आणि आरोग्य संभाळुया!

Web Title: Astro Tips: Before you start cooking, do 'this' little trick; Get rid of illness and financial problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.