Ashadhi Ekadashi 2023: यंदा पायी वारीला जायचा विचार करताय? जाणून घ्या वारीचे तारीखवार वेळापत्रक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:17 IST2023-06-07T14:15:50+5:302023-06-07T14:17:45+5:30
Ashadhi Ekadashi 2023: वारीला जायचे तर आहे, पण कधी, कसे आणि कुठे हे अनेकांना माहीत नसते, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती.

Ashadhi Ekadashi 2023: यंदा पायी वारीला जायचा विचार करताय? जाणून घ्या वारीचे तारीखवार वेळापत्रक!
आयुष्यात एकदा तरी पायी वारी करावी असं म्हणतात. कारण वारीचा अनुभव आपल्याला समृद्ध करणारा असतो. तिथे येणारे भाविक शिस्तबद्धपणे पांडुरंग हरी, वासुदेव हरी हा जयघोष करत प्रतिकूल परिस्थितीतुन मार्ग काढत वारी पूर्ण करतात. वारी केल्यामुळे आपला अहंकार गळून पडतो. माणसांची पारख होते. परिस्थितीशी जुळवून घेण्याचं अप्रत्यक्ष ट्रेनिंग मिळतं. मात्र हा अनुभव घेत असताना बाह्य चक्षूंनी बघाल तर उणिवा दिसतील, मन:चक्षूंनी अनुभव घ्याल तर समृद्ध व्हाल. वारीत हौसे, नवसे, गवसे असे सगळ्या प्रकारचे लोक येतात. जे खरे भाविक असतात, ते शिस्तबद्धपणे मार्गक्रमणा करतात. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतात. याउलट निव्वळ वारी कशी असते म्हणून बघायला आलेले लोक वारीच्या पथाची दुर्दशा करतात. त्यामुळे वारीला गालबोट लागते. म्हणून तुम्ही जर वारीत सहभागी होणार असाल तर सच्चा भाविकासारखे सहभागी व्हा. आनंद द्या , आनंद घ्या आणि विठ्ठलमय होऊन जा. त्यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे-
सदर वेळापत्रक श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी दिले आहे. त्यानुसार पालखी सोहळा पुढीलप्रमाणे-
११ जून : आळंदी येथून प्रस्थान
१२ जून : भवानी पेठ, पुणे
१३ जून : पुणे
१४ जून : सासवड
१५ जून : सासवड
१६ जून : जेजुरी
१७ जून : वाल्हे
१८ जून : लोणंद
१९ जून : लोणंद
२० जून : तरडगाव
२१ जून : विमानतळ फलटण
२२ जून : बरड
२३ जून : नातेपुते
२४ जून : माळशिरस
२५ जून : वेळापूर
२६ जून : भंडीशेगाव
२७ जून : वाखरी
२८ जून : पंढरपूर
२९ जून : आषाढी एकादशी
उभे रिंगण
२० जून : चांदोबाचा लिंब
२७ जून : बाजीरावची विहीर
२८ जून : पंढरपूर
गोल रिंगण :
२४ जून : पुरंदवडे
२५ जून : खुडूस फाटा
२६ जून : ठाकूरबुवाची समाधी
२७ जून : बाजीरावची विहीर
अधिक माहितीसाठी संपर्क : ८५३०६१७२७२