Kumbh Rashi Bhavishya 2022: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक स्तरावर लाभ, विद्यार्थ्यांना फलदायी काळ; साडेसातीचा टप्पा महत्त्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:19 IST2021-12-31T12:10:42+5:302021-12-31T12:19:13+5:30
Kumbh Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहील. वैवाहिक जीवन, करिअर आणि प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आगामी वर्ष कसे असेल, ते पाहूया...

Kumbh Rashi Bhavishya 2022: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक स्तरावर लाभ, विद्यार्थ्यांना फलदायी काळ; साडेसातीचा टप्पा महत्त्वाचा
सन २०२२ हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहील. आर्थिक दृष्टीने ही हे वर्ष तुम्हाला अपार यश देणारे ठरेल. कारण, जानेवारी महिन्यात मंगळाचा राशीबदल सर्वांत अधिक तुम्हाला लाभ देण्याचे कार्य करेल. यानंतर मार्चच्या सुरवातीच्या वेळी चार प्रमुख ग्रह म्हणजे शनी, मंगळ, बुध आणि शुक्राची एक सोबत युती करणे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल.
सन २०२२ च्या १२ एप्रिल महिन्यात मेष राशीमध्ये होत असलेल्या राहु संक्रमणामुळे कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नयेत. कोणत्याही गोष्टींनी प्रभावित न होता संयम ठेवण्याची गरज आहे. वर्षभरात तुमचे आरोग्य सामान्य राहील. जानेवारी महिन्यात तुम्हाला काहीसा तणाव जाणवू शकेल. फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत बहुतांश ग्रहांची प्रतिकूल चाल आणि त्याचे स्थान परिवर्तन या कारणाने तुम्हाला काही शारीरिक तक्रारींचा सामना ही करावा लागू शकतो.
करिअर आणि प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास, जानेवारी महिन्यात धनु राशीमध्ये मंगळ ग्रहाचा प्रवेश, तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश देण्याचे योग बनवेल. सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लहान मोठ्या विवादांचा सामना करावा लागू शकतो. याच्या व्यतिरिक्त, कुंभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी तसे तर, हे वर्ष उत्तम फलदायी सिद्ध होईल. परंतु, सकारात्मक अनुकूलता लाभण्यासाठी अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल. तसेच, तुमचे वैवाहिक जीवन या वर्षाच्या सुरुवातीला संमिश्र स्वरूपाचे राहील. या वर्षीच्या सुरवातीच्या दिवसात तुमचे तुमच्या जीवनसाथी आणि सासरच्यांसोबत, वाद-विवाद होण्याची शक्यता राहील. एप्रिलनंतर स्थितीमध्ये सुधारणा पाहायला मिळू शकेल. एप्रिल महिन्यात गुरु बृहस्पतीचे मीन राशीमध्ये होणारे संक्रमण अविवाहित व्यक्तींना विवाहाच्या बंधनात बांधण्याचे कार्य करेल.
सन २०२२ मध्ये थोडे धीराने, धैर्य ठेवत आणि समजुतीने निर्णय घ्यावे, असा सल्ला दिला जात आहे. नोकरीत सहयोगी किंवा सहकर्मींसोबत समस्या असेल तर, तुम्ही स्वतःला त्या वादांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करून या समस्येतून निघू शकतात. हे वर्ष कुंभ राशीतील महिलांसाठी उत्तम राहू शकेल.
कुंभ राशीच्या प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाले, तर यावर्षी उत्तरार्धात तुमच्या प्रेम जीवनातील समस्या कमी होत जातील आणि वर्षाच्या शेवटी तुमच्या नात्याला घट्ट करणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे.