शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:59 IST

Anant Chaturdash 2025 Vrat Rituals :अनंताचे व्रत हे विष्णूपूजेचे व्रत असते, व्रत म्हटल्यावर नियमही ओघाने आलेच, ते जाणून घेत पुढीलप्रमाणे २१ दिवस हे व्रत करा.

६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025)आहे. अनंत अर्थात भगवान विष्णूंच्या सर्वव्यापी निर्गुण निराकार शक्तीची पूजा. ही शक्ती सगुण रूपात अवतरली ती विष्णूंच्या दहा अवतारामध्ये. तसेच पांडुरंग, बालाजी हीदेखील विष्णुरूप मानली जातात. म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची अर्थात विष्णूंची पूजा करून पांडुरंगाष्टक, विष्णूसहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असे सांगितले जाते. पैकी व्यंकटेश स्तोत्राची माहिती देणारा एक निनामी लेख वाचनात आला. अनेकांना त्या व्रताचा उपयोगही झाला असे म्हटले होते. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत जरूर अंगिकारावे, ज्यांना नियम पाळणे शक्य नाही, त्यांनी निदान तिन्ही सांजेला व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणावे. 

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 

 १) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे. 

२) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावं.  

३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या . काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय.करणे टाळावे.  

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत सलग १४ वर्षं केल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या लाभ

४) रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावं . 

५) एकाग्रतेने, इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचावं. 

६) २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित असेल ते पूर्ण होतेच, असा भाविकांचा अनुभव आहे. 

खालील गोष्टींकडे जरा लक्ष द्या : 

या सेवे मध्ये काही अज्ञात शक्ती  तुम्हाला चक्क बाधा आणतील २१ दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही, त्या आधीच काहितरी चुक करुन  अगदी नीट लक्ष कुठेतरी, कसातरी, कुठुनतरी हे तुम्हाला हे बाधा रहित पणे २१ दिवस पूर्ण होऊ देणार नाही. पण आपण ढळायचे नाही!! . २१ दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रुपांत तुम्हाला भेटायला यायचे असते. तो तुम्हीच ओळखायचा. हा जागृति, स्वप्न, सुषुप्ती ह्या कोणत्याही आपल्या अवस्थांमध्ये येऊ शकतो !! 

|| शुभं भवतु || 

ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र.     श्री व्यंकटेश स्तोत्र 

व्यंकटेशो वासुदेवःप्रद्युम्नोऽमितविक्रमः।संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Traditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणAstrologyफलज्योतिषGanesh Visarjanगणेश विसर्जन