अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:40 IST2025-12-18T14:38:30+5:302025-12-18T14:40:01+5:30
Akshaye Khanna Astro: दृष्यम २, छावा, धुरंदर चित्रपटातून कम बॅक केलेला अक्षय खन्ना आज जी लोकप्रियता मिळवत आहे, त्याला कारणीभूत अभिनय, मेहनत आणि ग्रहस्थिती आहे!

अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
बॉलिवूडमध्ये असे मोजकेच अभिनेते आहेत, जे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहूनही जेव्हा पडद्यावर येतात, तेव्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. यापैकीच एक नाव म्हणजे अक्षय खन्ना. अक्षयच्या अभिनयात जी ताकद आहे, त्यामागे केवळ मेहनतच नाही, तर त्याच्या कुंडलीतील ग्रहांची विशेष स्थिती देखील कारणीभूत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय खन्नाच्या कुंडलीत असे काही 'राजयोग' आहेत, जे त्याला पन्नाशीच्या उंबरठ्यावर लोकप्रियता मिळवून देत आहेत.
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
अक्षय खन्नाची कुंडली आणि ग्रहांचे गणित
अक्षय खन्नाचा जन्म २८ मार्च १९७५ चा! ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणानुसार, त्याची कुंडली त्याच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडते, जे पुढीलप्रमाणे आहेत-
१. भद्र महापुरुष राजयोग (Mercury's Influence): अक्षयच्या कुंडलीत बुध ग्रह अत्यंत दृढ स्थितीत आहे. बुध हा बुद्धी, संवाद आणि अभिनयाचा कारक मानला जातो. बुधाच्या प्रभावामुळेच त्याच्या संवादाची फेक (Dialogue Delivery) आणि चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत नैसर्गिक आणि प्रभावी असतात. त्याच्या कुंडलीतील 'भद्र योग' त्याला बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ आणि कलेत निपुण बनवतो.
२. राजलक्षण राजयोग (Rajlakshna Rajyog): अक्षय खन्नाच्या कुंडलीतील सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे 'राजलक्षण राजयोग'. या योगामुळे व्यक्तीमध्ये एक प्रकारची राजेशाही आणि खानदानी चमक असते. अक्षय जेव्हा पडद्यावर गंभीर भूमिका साकारतो, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वातील हा राजेशाही रुबाब प्रेक्षकांना आकर्षित करतो. हा योग त्याला समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देतो.
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही
अभिनयात 'धुरंधर' असण्याचे कारण
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या कुंडलीत शुक्र आणि बुध या ग्रहांची युती किंवा शुभ दृष्टी असते, ते लोक अभिनय क्षेत्रात नाव कमावतात. अक्षयच्या बाबतीत-
>>सूर्याची स्थिती: कुंडलीत सूर्य प्रबळ असल्यामुळे त्याला प्रसिद्धी आणि यश मिळाले. तो नेहमीच 'क्वालिटी' कामाला महत्त्व देतो, जे त्याच्या ग्रहांच्या शिस्तप्रिय स्थितीचे लक्षण आहे.
>>निवडक भूमिका: अक्षय खन्ना फारसे चित्रपट करत नाही, पण जे करतो त्यात आपली छाप सोडतो. ही 'निवडक' वृत्ती त्याच्या कुंडलीतील शनीच्या प्रभावामुळे येते, जो त्याला संयम आणि गांभीर्य देतो.
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!