शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:26 IST

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे, पण सोन्याचे भाव आवाक्याबाहेर आहेत, अशा वेळी कामधेनुची मूर्ती आणा, जी धन-संपत्तीचा तुटवडा पडू देणार नाही!

यंदा ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) आहे. या दिवशी आपल्या धन, संपत्तीचा क्षय होऊ नये म्हणून सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र अलीकडे सोन्याचे वधारलेले भाव पाहता सोने खरेदी शक्य होईल का ते माहीत नाही, त्यानिमित्ताने पुढे संगीतलेली वस्तु अवश्य खरेदी करा, धन-संपत्ति आणि सुखाचा तुटवडा पडणार नाही. 

पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसेच घरात सकारात्मकता राहते. म्हणून वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धरला आहे. त्यातही शुक्रवारी अर्थात लक्ष्मी मातेच्या प्रिय वारी कामधेनू घरी आणल्यास अधिक लाभ होतो असे वास्तूशास्त्रज्ञ सांगतात. कामधेनूची संगमरवरी मूर्ती दिसायला मोहक, आकर्षक आणि वात्सल्यपूर्ण असते. फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊ. 

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..

गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते. शहरात तसे करणे शक्य नाही. त्यावर उपाय आहे मूर्ती किंवा प्रतिमेचा! वास्तु तज्ज्ञांच्या मते, कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात. असे मानले जाते की ज्या घरात कामधेनू गाईचे वासराचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरलेले राहते. वासरासह कामधेनू गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

- असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो.

- घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम (नैऋत्य) दिशेला लावा. लवकरच फायदा होईल.

- घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदी राहते. 

- वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात लक्ष्मी वास करू लागते. 

- उत्तर-पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. 

- घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते.

- पश्चिम कोनात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते. व्यक्तीचे उत्पन्न वाढते. आध्यात्मिक वातावरण तयार होते. 

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!

- घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील तर कामधेनू गाईचे चित्र ईशान्य कोपर्‍यात लावावे आणि नंतर नियमित प्रार्थना करावी.

- घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता कायम ठेवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र लावावे.

- त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. लवकरच फायदा होईल.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाVastu shastraवास्तुशास्त्र