शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळवण्यासाठी महिनाभर न चुकता विष्णूसहस्त्रनाम ऐका; वाचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:19 IST

Adhik Maas 2023: विष्णू सहस्त्र नाम हे शब्द उच्चारताच आठवण होते सुब्बालक्ष्मी यांची; त्यांच्या मंगल स्वरात महिनाभर हे स्तोत्र ऐका आणि अनुभूती घ्या. 

१८ जुलै पासून अधिक श्रावण मास (Adhik Maas 2023) सुरू होत आहे, तो १७ ऑगस्ट रोजी संपून निज श्रावण अर्थात मुख्य श्रावण सुरू होणार आहे. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या महिन्यात विष्णू भक्ती केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात उपासना म्हणून महिनाभर रोज सकाळी न चुकता विष्णू सहस्त्र नाम ऐकून दिवसाची प्रसन्न सुरुवात करता येईल शिवाय विष्णू स्तुती कानावर पडून महिनाभर श्रवण भक्ती सहज होऊ शकेल. 

विष्णू सहस्त्र नाम हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. ते नुसते म्हणून उपयोग नाही तर त्याचे अचूक उच्चार होणे महत्त्वाचे आहे. म्हणून महिनाभर हा श्रवणानंद घेण्यासाठी लेखात नाव सुचवले आहे, ते म्हणजे दिवंगत गायिका सुब्बालक्ष्मी यांचे!

एम. एस. सुब्बालक्ष्मी यांचे नाव आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. केवळ शास्त्रीय गायनात नव्हे तर त्यांनी अध्यात्मात स्तोत्रपठण करून सिंहाचा वाटा उचलला आहे. म्हणून आजही अनेक घरात सकाळची सुरुवात त्यांनी गायलेल्या 'व्यंकटेश सुप्रभातम' या स्तोत्राने होते. अधिक मासात आपल्या नित्य उपासनेला जोड द्यायची आहे ती विष्णू सहस्त्र नाम ऐकण्याची. मोजून २८ मिनिटात हे स्तोत्र ऐकून पूर्ण होते. त्यामुळे सकाळी आपले आवरून कामासाठी बाहेर पडताना हे स्तोत्र आरामात ऐकून होईल. युट्युबवर या स्तोत्राची लिंक सहज उपलब्ध आहे. 

अधिक मासात हेच स्तोत्र का? जाणून घ्या फायदे :

>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो. 

विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?

>> हे स्तोत्र नित्य उपासनेत म्हटल्यास अधिक फायदे होतात. पण एरव्ही शक्य झाले नसेल तर निदान अधिक मासात हे स्तोत्र आवर्जून ऐकावे. 

>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे. 

>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.

असे हे मंगलकारी स्तोत्र तुम्हीसुद्धा ऐका आणि त्याचे होणारे लाभ अनुभवा. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाShravan Specialश्रावण स्पेशल