Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 17:00 IST2018-10-11T16:59:16+5:302018-10-11T17:00:49+5:30
इंधन दरवाढी विरोधात शिवाजी चौकात सुरु असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले.

Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक
बीड : इंधन दरवाढी विरोधात शिवाजी चौकात सुरु असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पेट्रोल पंपावर दगडफेक करत इंधन दरवाढ विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरवाढीच्या संतापातून हा प्रकार झाल्याचे युवक तालुका अध्यक्ष प्रा. विजय मुंडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, युवक कॉंग्रेसच्यावतीने आज दुपारी शहरातील तीन पेट्रोल पंपावर इंधन दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवाजी चौकातील पेट्रोल पंपावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तेथील बोर्डवर तुफान दगडफेक केली. यांनतर गोंधळ उडून एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर पंपचालक सुहास डूबे संभाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार देत आहेत.
दरम्यान, इंधन दरवाढीमुळे संतापून आंदोलकांनी दगडफेक केल्याचे युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. विजय मुंडे यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे, राहुल कराड, नितीन शिंदे, राहुल कांदे, मनोज संकाये, शशी शेखर चौधरी, किशोर जाधव, सय्यद बबलू, धनंजय कावळे, अनंत सलगर, नितीन हारे आदींचा सहभाग होता.
https://www.youtube.com/watch?v=-JKhgKCDVpw