सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 16:49 IST2022-09-05T16:46:47+5:302022-09-05T16:49:11+5:30
पोलिसांनी माणिक नगर मधील एका युवकास लागलीच ताब्यात घेतले.

सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत
परळी (बीड): सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकास ताब्यात घेतले आहे. बालाजी गुट्टे (रा. माणिकनगर) असे युवकाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांचे सर्व परिस्थितीवर नियंत्रण असून शहरात शांतता आहे.
सोशल मीडियातील एका पोस्टमुळे सोमवारी परळीत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यामुळे आज दुपारी संतप्त जमाव परळी पोलीस ठाण्यासमोर जमा झाला.
समाजाच्या भावना दुखाविल्याप्रकरणी शेख शरीफ यांनी बालाजी गुट्टे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी माणिक नगर मधील बालाजी गुट्टे यास अटक केली. परळीचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक नेमले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीस अटक केली असून शहरात शांतता आहे.