बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:28 IST2020-07-03T19:26:14+5:302020-07-03T19:28:36+5:30

आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथे झाला जीप आणि दुचाकीत अपघात 

A young man who went to the village for his sister's wedding died in an accident | बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

बहिणीच्या लग्नासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

कडा : चारचाकी व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कडा कारखाना येथे घडली शुकवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अभिजित सुखदेव वाघमारे ( हाडुंग्री, २७ ) असे मृत तरुणाचे नाव असून तो बहिणीच्या लग्नानिमित्त पनवेल येथून भूमकडे जात होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडुंग्री येथील अभिजित वाघमारे हा तरुण पनवेल येथे एस.टी. चालक म्हणून कार्यरत होता.  अभिजीत याच्या बहिणीचा ७ जुलै रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अभिजित शुक्रवारी पनवेल येथून दुचाकीने ( एम.एच. 46, व्ही.  5165 ) भूमकडे निघाला. दुपारी तीन वाजेच्या दरम्यान बीड-कडा-नगर कडा कारखाना येथे समोरून येणाऱ्या जीपसोबत ( एम.एच. 16,  डी.एच. 4444 ) अभिजीतच्या दुचाकीची धडक झाली. यात गंभीर जखमी झाल्याने अभिजीतचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक बाबासाहेब गर्जे, महेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली. 
 

Web Title: A young man who went to the village for his sister's wedding died in an accident