शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:23 IST

Yash Dhaka Murder Case: पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून आढावा : युवासेना जिल्हाप्रमुख अजूनही मोकाटच

बीड : शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात तीन आरोपी अटक झाले असून शिंदे गटाचा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिराळे अजूनही मोकाटच आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शुक्रवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेत बसून यशच्या मित्र आणि मैत्रिणींची कसून चौकशी केली. त्या रात्री काय घडले? आणि नेमके कारण काय? याची माहिती घेण्यात आली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खुनांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा कसलाही धाक नसल्याचा आरोप केला जात आहे. अशातच बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात यश ढाका याचा भर रस्त्यावर खून करण्यात आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक आक्रमक झाले. बाबुराव पोटभरे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, सुजात आंबेडकर आदींनी यावर आवाज उठविला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच एसआयटी (SIT) आणि बदलीची मागणी करण्याचा इशारा दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर देवेंद्र ढाका आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एसपींची भेट घेत सर्व आरोपींना अटक करून कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

‘त्या’ मुलीचीही केली चौकशीयश ढाका याचा खून मुलीला का बोलतो या कारणावरून झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणातील मुलीचीही चौकशी करण्यात आली. सोबतच त्याचे मित्र आणि व्हायरल व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आदींची उपस्थिती होती.

ढाका कुटुंबीयांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेटमोकाट असलेल्या दोन आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी ढाका कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. ॲड. आंबेडकर यांनी तत्काळ वकिलांशी चर्चा केली, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, अमरसिंग ढाका, डॉ. नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम ऊर्फ गोटू वीर, लखन जोगदंड आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Police Investigate Dhaka Murder, Question Friends and Key Girl

Web Summary : Police investigate Yash Dhaka's murder in Beed, questioning friends and a girl linked to the case. Three are arrested, but a key suspect remains at large. The family seeks justice, meeting Prakash Ambedkar for support.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीBeedबीड