घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 15:52 IST2021-09-29T15:50:24+5:302021-09-29T15:52:25+5:30
rain in beed : सततधार पावसाचा मोठा फटका तालुक्याला बसत आहे.

घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
गेवराई : तालुक्यातील बोरगाव ( बु) येथील मातीच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये एक माहिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री बोरगाव ( बु) येथे घडली. प्रमिला उत्तम जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींवर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत.
सततधार पावसाचा मोठा फटका तालुक्याला बसत आहे. पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून अनेक सर्वसामान्यांचे घरे पाण्यात गेले आहेत. बोरगाव ( बु ) येथील जाधव कुटुंबीयांचे मंगळवारी रात्री घराची भिंत कोसळली. यात प्रमिला उत्तम जाधव ( 45 ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर विकास उत्तमराव जाधव ( 48 ) व छबुबाई विकास जाधव ( 44 ) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यात यापूर्वी सिरसदेवी येथील घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता.