गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:05 IST2025-06-20T11:48:00+5:302025-06-20T12:05:26+5:30
नऊ लाचखोरांचे प्रस्ताव चार वर्षांपासून प्रलंबित

गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
- सोमनाथ खताळ
बीड : नियमात होणाऱ्या कामांसाठीही पैसे घेऊन कोट्यवधींची माया जमवली. राज्यातील अशाच नऊ लाचखोरांवर अपसंपदा आणि भ्रष्टाचार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यांची चौकशी होऊन मालमत्ता गोठविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाला प्रस्तावही पाठविले. परंतू चार वर्षांपासून ते धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे. विशेष म्हणजे स्मरणपत्रही दिले. परंतु अद्यापही त्यांच्या मालमत्ता गोठविण्यासंदर्भात काहीच उपाययोजना केल्या नाहीत.
कोणाचा प्रस्ताव कधीपासून प्रलंबित?
१. परिवहन विभाग
आरोपी : श्यामराव महादेव शेटे (वय ५४, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी) आणि शमिष्ठा श्यामराव शेटे (पत्नी, वय ५०)
रक्कम: ४७,६९,७७४
गुन्हा दाखल : ११-०१-२०१९
अहवाल पाठविला : ०१-१०-२०२१
२. उद्योग, उर्जा व कामगार विभाग
आरोपी: मोहन जगदेवराव धोत्रे (सेवानिवृत्त कामगार कल्याण आयुक्त, मुंबई) आणि स्वाती मोहन धोत्रे (पत्नी), योगेश मोहन धोत्रे (मुलगा)
रक्कम : २,१४,३२,४०८
गुन्हा दाखल : २८-११-२०१४
अहवाल पाठविला : ११-०४-२०२५
३. नगर विकास विभाग
आरोपी : सुभाष दिगंबर जगताप (नगरसेवक, पुणे) आणि उषा सुभाष जगताप (नगसेविका, पुणे)
रक्कम : १,३२,२४,६९१
गुन्हा दाखल : ०४-०३-२०१५
अहवाल पाठविला : १०-०९-२०२१
आरोपी: लता प्रकाश गायकवाड (सेवानिवृत्त जकात निरीक्षक, मुंबई), सोनाली समीर तांबे (खासगी व्यक्ती)
रक्कम : १२,३२,०००
गुन्हा दाखल : २९-०१-२०१९
अहवाल पाठविला : १६-०३-२०२३
आरोपी: गुलकंद अविनाश दळवी (जकात निरीक्षक, मुंबई)
रक्कम : १,१८,१८,०३९
गुन्हा दाखल : ०७-०४-२०१६
अहवाल पाठविला : २०-०६-२०२३
आरोपी : किशोर हरी नाईक (स्वच्छता निरीक्षक, मुंबई), आर्यशी किशोर नाईक (पत्नी)
रक्कम : ५०,३८,५१३
गुन्हा दाखल : २९-०९-२०१६
अहवाल पाठविला : २९-०८-२०२३
४. कृषी व पदुम विभाग
आरोपी : श्रीधर साहेबराव सर्जे (कृषी अधिकारी, परभणी), ज्योती श्रीधर सर्जे (पत्नी)
रक्कम : १२,७७,२६७
गुन्हा दाखल : ३१-१२-२००८
अहवाल पाठविला : १४-०६-२०२३
५. जलसंपदा विभाग
आरोपी : बाळासाहेब भाऊसाहेब पाटील (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, कोकण पाटबंधारे विभाग, मुंबई)
रक्कम : २,८२,५२,०००
गुन्हा दाखल : २३-०६-२०१६
अहवाल पाठविला : ०८-०४-२०२२
६. सार्वजनिक बांधकाम विभाग
आरोपी : गजानन शंकर खाडे (तत्कालीन कार्यकारी अभियंता, छत्रपती संभाजीनगर), अमोल गजानन खाडे (मुलगा)
रक्कम : २,४८,८१,४६९
गुन्हा दाखल : १८-०६-२०१४
अहवाल पाठविला : २०-०७-२०२१
अशी आहे आकडेवारी
खाते - प्रकरणे - रक्कम
नगरविकास विभाग - ४ - ३,१३,१३,२४३
परिवहन विभाग - १ - ४७,६९,७७४
कृषी व पदुम - १ - १२,७७,२६७
जलसंपदा - १ - २,८२,५२,०००
उद्योग विभाग - १ - २,१४,३२,४०८
सा. बां. विभाग - १ - २,४८,८१,४६९
एकूण - ९ - ११,१९,२६,१६१