"सतीश भोसले आणि त्याच्या 'आका'वर फडणवीस सरकार कारवाई करणार का? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:58 IST2025-03-06T20:55:10+5:302025-03-06T20:58:11+5:30

Satish Bhosale Suresh Dhas: भाजपचा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर सुरेश धस वादात सापडले आहेत. 

when will Fadnavis will take action against Satish bhosale and suresh dhas | "सतीश भोसले आणि त्याच्या 'आका'वर फडणवीस सरकार कारवाई करणार का? काँग्रेसचा सवाल

"सतीश भोसले आणि त्याच्या 'आका'वर फडणवीस सरकार कारवाई करणार का? काँग्रेसचा सवाल

Suresh Dhas Sutish Bhosale: भाजपचा पदाधिकारी असलेला आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याचा व्हिडीओ समोर आला. सतीश भोसले याचे सुरेश धस यांच्यासोबतचे फोटोही समोर आले. त्याच्यासोबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली असून, त्यावरून सुरेश धस विरोधकांच्या रडारवर आले आहेत. सुरेश धस यांना सतीश भोसलेंचा आका म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसने म्हटले आहे की, "भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह बीड मधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण केली आहे." 

गुन्हा दाखल केलेला नाही

"अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडले, डोळ्यावर गॉगल असा भाजपचे पदाधिकारी सतीश भोसले याचे फोटो वायरल झाले आहेत. त्याची उघडपणे गुंडगिरी चालू असताना अजूनही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही", असा संताप काँग्रेसने व्यक्त केला आहे. 

"बीडमध्येगुन्हेगारी सत्र चालू असतानाच आता सतीश भोसले आणि त्याचा "आका" यांच्यावर फडणवीस सरकार कारवाई करणार का?", असा सवाल काँग्रेसने महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. 

सुरेश धसांनी भोसलेपासून स्वतःला केले दूर

सतीश भोसलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीका सुरू झाली. त्यावर धस यांनी भूमिका मांडली. 

धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी या घटनेचे समर्थन मी केलेले नाही. समोरच्या व्यक्तीने फिर्याद द्यावी. सतीश भोसलेला मी ओळखतो. तो कधीतरी माझ्याकडे येतो. पाठीमागे तो काय उद्योग करतो, हे मला थोडी माहिती आहे. शंभर टक्के सतीश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे."

"कोण कोणाला बॉस म्हणतो याची माहिती आपण ठेवू शकत नाही. तो मला बॉस म्हणत असेल, तर मीच म्हणतोय की, त्याच्यावर योग्य कारवाई व्हायला हवी. ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे, मला माहिती आहे. हे प्रकरण बीडमधील नाही. खोटं सोनं दिल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला, अशी माझी माहिती आहे", असे धस त्या व्हायरल व्हिडीओबद्दल बोलताना म्हणाले. 

Web Title: when will Fadnavis will take action against Satish bhosale and suresh dhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.