संतोष देशमुख यांना कोणत्या हत्याराने मारले? आरोपींच्या वकीलांनी दिली माहिती; आका कोण तेही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 20:41 IST2025-01-04T20:33:05+5:302025-01-04T20:41:01+5:30
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाती आणखी दोन मुख्य आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.

संतोष देशमुख यांना कोणत्या हत्याराने मारले? आरोपींच्या वकीलांनी दिली माहिती; आका कोण तेही सांगितलं
Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आणखी दोन मुख्य आरोपींना आज पुण्यातून पोलिसांनी अटक केली. या आरोपींना आज कोर्टाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी आरोपी अजूनही फरारी आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. तर दुसरीकडे सरपंच देशमुख यांच्या लोकेशनची आरोपींना माहिती देणारा सिद्धार्थ सोनावणे यालाही पोलिसांनी कल्याणमधून ताब्यात घेतला आहे. सीआयडी अधिकाऱ्यांसह एसआयटीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, आज कोर्टासमोर आरोपींना हजर केले. कोर्टात नेमकं काय घडलं? याची सर्व माहिती आरोपींच्या वकीलांनी आज माध्यामांना दिली.
'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड
वकील म्हणाले, आरोपींना आता १८ तारखेपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून फरार आरोपींची माहिती घ्यायची आहे. बाकीच्या आरोपींच्या समोर बसवून पोलिसांना चौकशी करायची आहे. आरोपींनी कोणते हत्यार वापरले याचं काही पीसीआर यादीत नमुद केलेले नाही. जर त्यांनी हत्यार वापरलेले नसेल तर त्यांना त्यांचा पीसीआर घेण्याचा अधिकार नाही. ही काही काल्पनिक घटना नाही, ही घटना प्रत्यक्ष घडली असं त्यांचं मत असेल तर त्यांनी डॉक्टरांचं मत घ्यायला पाहिजे. यात त्यांच्याकडून आरोपील मारहाण झाली आहे ती हत्यारे कोम कोणती सू शकतात. जर ती हत्यार जप्त केली आहेत. त्या हत्यारांशिवाय दुसरे कोणते हत्यार आहेत का? असं त्यांनी निष्पन्न करणे आवश्यक आहे, असंही वकील म्हणाले.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
टोळी गुन्हेगारीवर बोलताना वकील म्हणाले, "हा गुन्हा ३०२चा आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या प्रमाणे मकोका लावावा, तर संघटीत गुन्हेगारी निष्पन्न होईल,असंही वकीलांनी सांगितलं. गुन्हेगारांचा आका कोण आहे, या चर्चा बाहेर सुरू आहेत. या आकाच्या आज कोर्टरुममध्येही चर्चा झाली. मेन आका कोण आहे या प्रश्नावर बोलताना वकील म्हणाले, आम्ही काय आका वैगेरेचा संबंध नाही. विष्णू चाटे यांना अटक करुन वीस दिवस झाले आहे. विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. वास्तविक पाहता हा किडनॅपिंगचा गुन्हा आहे. त्यांनी या आरोपींना यात घेणे आवश्यक होतं. यावरुन तपास यंत्रणा किती गांभीर्याने प्रकरण हाताळते हे स्पष्ट दिसते, असंही वकील म्हणाले.