शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

बीड : मागील १४ महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव आणि त्यानंतर उद्रेक सुरूच आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात बारावीचे वर्ग सुरू झाले. ...

बीड : मागील १४ महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव आणि त्यानंतर उद्रेक सुरूच आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात बारावीचे वर्ग सुरू झाले. पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून घेतले. परीक्षेची तारीख ठरली. परीक्षा मंडळाकडून नियोजन सुरू झाले. उत्तरपत्रिका व इतर पूरक साहित्य संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना पुरवठा केले. मात्र, मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाढला. केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारही तसेच पाऊल टाकत आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थी व पालक परीक्षेबाबत संभ्रमात आहेत. ऑफलाईन परीक्षेचा घाट घालून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांचे जीव धोक्यात घालू नयेत, असा सूर एकीकडे असताना ऑनलाईन अथवा ऑफलाईन कशीही घ्या, पण परीक्षा घ्याव्यात, असा सूर दुसरीकडे उमटत आहे.

काय असू शकतो पर्याय?

सध्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी वर्ग लसीकरणाअभावी धोकादायक टप्प्यात आहे. बारावीच्या परीक्षेतील गुणांवर आता काहीही अवलंबून नाही. सर्व शाखेतील प्रवेशांकरिता स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहेत. तेव्हा बारावी परीक्षेकरिता गर्दी जमवून विषाची परीक्षा घेण्यात काही हशील नाही. विद्यापीठाप्रमाणे ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात. प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक चाचणीद्वारे घ्यावी. या वर्षी जीव वाचवून शैक्षणिक व्यवस्था टिकवणे एवढेच करता आले तरी पुरे. - विवेक मिरगणे, प्राचार्य, बंकटस्वामी महाविद्यालय, बीड.

-----

इयत्ता बारावीचे वर्ष उच्च शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी या परीक्षेतील गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. आज विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत आहेत. कोरोना महामारीमुळे परीक्षा घेणे बोर्ड प्रशासनाला शक्य होत नसले तरी या बाबतीत निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात जाणार नाही याबाबत गांभीर्याने पाहावे लागेल. - प्रदीप देशमुख, प्राचार्य, स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड.

------

आमचा विचार करा, परीक्षा लवकर घ्या

सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी योग्य ते निर्बंध लावून परीक्षा घ्यावी. - कौस्तुभ मुळे, विद्यार्थी,

-------

तारीख निश्चित करून परीक्षा लवकरात लवकर व्हाव्यात. कोरोनाची भीती आहे. मात्र, अभ्यास केलेला असल्याने व परीक्षा होत नसल्याने कंटाळून गेलो आहोत. कशाही प्रकारे परीक्षा घेऊन अनिश्चितता संपवावी. - आयुष हावळे, विद्यार्थी.

---------

बारावीच्या परीक्षा होणे आमच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. कोरोना, म्युकरमायकोसिस व उद्भवणारे संसर्गजन्य रोग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे आरोग्य व त्यांची मानसिकता लक्षात घेऊन सरकारने परीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्यात. - गौरव देशपांडे, विद्यार्थी.

---------

असे असू शकतात पर्याय

तिन्ही शाखांच्या मुख्य तीन विषयांची परीक्षा घेऊन त्याआधारे इतर विषयांचे गुणांकन करावे किंवा एक भाषा व इतर तीन विषयांची परीक्षा व्हावी. ९० मिनिटांचा वेळ द्यावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह असावे. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा उद्रेक जेथे नाही तेथे व नंतर इतरत्र परीक्षा घेण्यात यावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

------------