लग्नातील जेवण पडले महाग; चेन लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:14+5:302021-01-13T05:29:14+5:30

बीड : शहरातील वृंदावन गार्डन येथे लग्न समारंभासाठी गेलेले राजीव नामदेव घोडके हे जेवणाच्या रांगेत उभे असताना त्यांच्या गळ्यातील ...

Wedding meals fell expensive; The chain lengthened | लग्नातील जेवण पडले महाग; चेन लांबविली

लग्नातील जेवण पडले महाग; चेन लांबविली

Next

बीड : शहरातील वृंदावन गार्डन येथे लग्न समारंभासाठी गेलेले राजीव नामदेव घोडके हे जेवणाच्या रांगेत उभे असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळे दीड ग्रॅम सोन्याची गोफ आकारातील चेन अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना ९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली. ७१ हजार ९५ रुपयांच्या चेन चोरीप्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोना. जायभाये करीत आहेत.

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

गेवराई : तालुक्यातील उमापूर फाटा परिसरात विना परवाना अवैधरीत्या चोरटी वाळू वाहतूक करताना पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू जप्त केली. गेवराई उप विभागीय कार्यालयातील कर्मचारी श्रीनिवास यादव गोविंदवाड यांच्या फिर्यादीवरून गणेश श्याम आव्हाड विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

फायटरने मारहाण करून दिली धमकी

बीड : शहरातील साठे चौक परिसरात ९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अरुण दमाजी मीरपगार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एकाने फायटरने हल्ला केला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उमेश सवाई, विकी सवाई, महेश सवाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

Web Title: Wedding meals fell expensive; The chain lengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.