'गहिनीनाथ गडाची परंपरा पुढे नेणार'; नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांसोबत मुंडे बहीण-भावाची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:57 IST2026-04-09T15:55:23+5:302026-04-09T15:57:53+5:30

मुख्यमंत्री, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; नारळी सप्ताहात रंगला भक्तीचा सोहळा.

'We will carry forward the tradition of Gahininath fort'; Chief Minister Devendra Fadanvis's assurance at the Conclusion of 94th Narali Saptaha at Mhasobachi Wadi; | 'गहिनीनाथ गडाची परंपरा पुढे नेणार'; नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांसोबत मुंडे बहीण-भावाची एन्ट्री

'गहिनीनाथ गडाची परंपरा पुढे नेणार'; नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांसोबत मुंडे बहीण-भावाची एन्ट्री

कडा (बीड): आष्टी तालुक्यातील बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील म्हसोबाची वाडी येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रस्थापित केलेल्या पारंपरिक ९४ व्या नारळी सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांना संबोधित करताना गहिनीनाथ गडाची अध्यात्मिक परंपरा पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "संत वामनभाऊ यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्याकडे मोठी आध्यात्मिक शक्ती होती. हीच परंपरा आज महंत विठ्ठल महाराज समर्थपणे चालवत आहेत. गहिनीनाथ गडाचे हे कार्य आणि परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल." यावेळी व्यासपीठावर गहिनीनाथ गडाच्या वारशाचा गौरव करण्यात आला.

एकाच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांसह 'बहिण-भाऊ' दाखल
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून झालेली एन्ट्री. व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. महंतांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेताच भाविकांनी 'डी.एम.'च्या नावाच्या घोषणा दिल्या. यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, जयदत्त क्षीरसागर, प्रताप ढाकणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title : गहिनीनाथ गढ़ की परंपरा जारी; मुख्यमंत्री के साथ मुंडे भाई-बहन की एंट्री

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने नारियल सप्ताह महोत्सव के समापन पर गहिनीनाथ गढ़ की आध्यात्मिक विरासत के लिए समर्थन का वादा किया। उन्होंने संत वामनभाऊ के कार्य और महंत विट्ठल महाराज के नेतृत्व में जारी परंपरा की सराहना की। कार्यक्रम में मुख्यमंत्री फडणवीस और मुंडे भाई-बहन एक साथ पहुंचे।

Web Title : Gahininath Gad tradition continues; Munde siblings' entry with CM at festival.

Web Summary : CM Fadnavis pledged support for Gahininath Gad's spiritual legacy at the Nariyal Saptah festival's conclusion. He lauded Sant Wamanbhau's work and the ongoing tradition led by Mahant Vitthal Maharaj. The event was marked by the joint arrival of CM Fadnavis and the Munde siblings.