शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST

गादी व्यावसायिक अडचणीत अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्न सराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यात जमा आहे. याशिवाय लॉजिंगही ...

गादी व्यावसायिक अडचणीत

अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्न सराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यात जमा आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने वसतिगृहेही ओस पडली आहेत. परिणामी, गाद्यांची मागणी कमालीची घटली असून गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंब चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कोंबडे यांनी केली आहे.

धूम्रपानामुळे आजार

अंबाजोगाई : आहाराच्या बदलत्या सवयी, अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील बदलामुळे खाजगी रुग्णालयामध्येही गर्दी वाढू लागली आहे. धूम्रपानावर बंदी असतानाही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशा प्रकारावर निर्बंध घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धायगुडे यांनी केली आहे.

कर्जवसुली थांबवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजार पेठ बंद आहे. सर्व सामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्ज वसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्याम सरवदे यांनी केली आहे.

ओव्हरलोड वाहतुकीने लहान रस्त्यांची दैना

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक प्रदीप पांडे यांनी केली आहे.