परराज्यातील कामगारांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:35+5:302021-03-27T04:35:35+5:30
झाडांचे संगोपन करा नेकनूर : येथील बाजारतळावर काही दिवसांपूर्वी सावलीसाठी झाडे लावण्यात आली आहेत. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे झाडे ...

परराज्यातील कामगारांची भटकंती
झाडांचे संगोपन करा
नेकनूर : येथील बाजारतळावर काही दिवसांपूर्वी सावलीसाठी झाडे लावण्यात आली आहेत. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे झाडे देखील जोमात आलेली आहेत, मात्र काही विक्षिप्त लोकांकडून ती झाडे तोडली जात आहेत. या झाडांपासून बाजारतळावर सावली तयार होईल, त्यामुळे झाडांचे संगोपन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच झाड तोडणाऱ्यावर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
वीज तारांचा धोका
माजलगाव : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीज तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष केलेले आहे. ही रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.