Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या! महिला पोलिसासोबतचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:56 IST2025-01-28T15:54:18+5:302025-01-28T15:56:28+5:30

Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे.

walmik Karad's problems increase Call recording with female police officer goes viral | Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या! महिला पोलिसासोबतचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या! महिला पोलिसासोबतचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे. या गुन्हात कराड याच्यावर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एका महिला पोलिसासोबत कराड याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे. यामध्ये 'जिल्ह्याचा बाप बसलाय त्या मुलाला सोडून द्या' असं वाल्मीक कराड बोलत असल्याचे दिसत आहे. 

बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव असणाऱ्या मोहित कंबोज यांचा खुलासा; "हत्येच्या दिवशी.."

सध्या सोशल मीडियावर वाल्मीक कराड आणि महिला पोलीस यांच्यातील कॉलवरील हा संवाद व्हायरल झाला आहे. वाल्मीक कराड आणि बीड येथील सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा हा कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

कॉल रेकॉर्डिंग काय आहे?

वाल्मीक कराड यांनी बीड जिल्ह्यातील सायबर सेलला कॉल केला आहे. यामध्ये समोरून महिला पोलीस अधिकारी बोलत असल्याचे दिसत आहे. व्लामीक कराड सांगत आहेत की,'ताई व्लामीक कराड बोलतो. ते पोर करत आहेत, भैय्या पोस्ट डिलिट करा. त्यांनी आधी सुरुवात केली. आम्ही शांत होतो. इग्नोर करायचं भैय्या, एवढं कशाला मनावर घ्यायच. इथं आम्ही बाप बसलो आहे. मी असल्यावर काय चिंता', असं वाल्मीक कराड बोलत असल्याचे दिसत आहे.

राजकीय वर्तुळातून टीका 

यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप सुरू झाले आहे. यावरुन आता सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. दमानिया म्हणाल्या,  हा संवाद ऐकला. हे खरच बीड जिल्ह्यातील बाप आहेत. वाल्मीक कराड याने धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा एक करुन ठेवली आहे. पोलिसांवरही मोठा दबाव आहे. जिल्ह्याचा कारभार हा पालकमंत्र्याच्या दहशतीखाली चालतो. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीखाली सर्व चालते, कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. 

वाल्मीक कराड याच्या कॉल रेकॉर्डिंगवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. अंधारे म्हणाल्या,मी अजूनही ही क्लिप ऐकलेली नाही. मुख्यमंत्र्‍यांनी अधिवेशन काळात बीडच्या गुन्हेगारीची पाळमुळं काढू असं सांगितलं होतं. जर त्यांची खरच इच्छा असेल तर आधी परळीतील पोलिसांचं सिंडीकेट मोडून काढले पाहिजे, असंही अंधारे म्हणाल्या.  वाल्मीक कराड यांचे फोटो मोठ्या नेत्यांसोबत आहेत. कराड याचे आर्थिक साम्राज्य बघितले तर बीडमध्ये नवीन आलेला पीआय पोलीस मुख्यालयात न जाता आधी वाल्मीक कराड यांच्याकडे सलाम ठोकायला जात असेल ही परिस्थिती आहे,असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.  

Web Title: walmik Karad's problems increase Call recording with female police officer goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.