परळीत आता वाल्मीक कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन, तर आईचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:09 IST2025-01-14T13:05:02+5:302025-01-14T13:09:02+5:30

आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

Walmik Karad supporters protest on the Rani Laxmi Bai tower in Parli, while his mother sits outside the police station | परळीत आता वाल्मीक कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन, तर आईचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

परळीत आता वाल्मीक कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन, तर आईचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

परळी ( बीड): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांना सहआरोपी करा या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील जलकुंभावर चढून आंदोलन केले होते. याच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी ( दि. १४ ) वाल्मीक कराड समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. 

खोटे गुन्हे रद्द करा, वाल्मीक कराडला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या मातोश्री पारूबाई बाबुराव कराड व कराड समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन  सुरू केले आहे. आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

याचसोबत शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून कराड समर्थकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा,आमदार सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा बजरंग सोनवणे, मनोज जरांगे यांनी परळी शहराची बदनामी सुरू केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आक्रमक आंदोलकांनी राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ ठिय्या दिला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय संतोष देशमुख  हत्या प्रकरणात जातीय व राजकीय द्वेषातून कारवाई न करता नि:पक्षपणाने चौकशी करावी.

Web Title: Walmik Karad supporters protest on the Rani Laxmi Bai tower in Parli, while his mother sits outside the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.