Walmik Karad : मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 23:09 IST2025-01-14T22:45:32+5:302025-01-14T23:09:34+5:30

Walmik Karad : वाल्मीक कराड याच्या समर्थनात आज परळीमध्ये कराड कुटुंबीयांसह समर्थकांनी आंदोलन केले, तब्बल १२ तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Walmik Karad Karad families withdraw protest after 12 hours | Walmik Karad : मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन

Walmik Karad : मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन

Walmik Karad ( Marathi News ) :  वाल्मीक कराड याच्याविरोधात आज याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान,  आज कराड समर्थक आक्रमक झाले होते, सर्मथकांसह कराड कुटुंबीयांनी आज परळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. हे आंदोलन १२ तासानंतर पाठीमागे घेतले आहे. 

Walmik Karad :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

 रात्री नऊ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनावेळी एका समर्थकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या एका समर्थकाला ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे वातावरण तणापूर्ण झाले होते. तब्बल १२ तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

यावेळी वाल्मीक कराड याची पत्नी मंजिली कराड यांनी समर्थकांना भावनिक आवाहन केले आहे. मंजिली कराड म्हणाल्या, समर्थकांनी अशा पद्धतीचे कोणतेही पाऊल उचलू नये असं आवाहन केले आहे. आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे, असंही कराड म्हणाल्या.

वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

 

वाल्मीक कराड याची आज पोलीस कोठडी संपली. आज कोर्टात कराड याला हजर केले, कोर्टाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कराड याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या विरोधात आज कराड समर्थक आक्रमक झाले होते, यावेळी वाल्मीक कराड याच्या पत्नीने आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले. 

वाल्मीक कराड याची पत्नी मंजिली कराड यांनी आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मीक कराड याच्यावर लावण्यात आलेला मकोका हा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलाअसून देशमुख हत्येशी संबंध नसल्याचा दावा करण्यात आला. बजरंग सोनवणे यांनी आपल्या पतीला जीव मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवीन एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून ते सुरेश धस यांच्या जवळचे असल्याचा दावाही त्यांनी केला. 

Web Title: Walmik Karad Karad families withdraw protest after 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.