Walmik Karad : वाल्मीक कराड अन् इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास; नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:20 IST2025-01-23T15:18:36+5:302025-01-23T15:20:35+5:30

Walmik Karad : वाल्मीक कराड याला पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

walmik Karad and other accused travelled in the same car New CCTV footage comes to light | Walmik Karad : वाल्मीक कराड अन् इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास; नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Walmik Karad : वाल्मीक कराड अन् इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास; नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. तर बाकीच्या मुख्य तीन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले आहे, तर वाल्मीक कराड याला पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे.दरम्यान, आता एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. या फुटेजवरुन ३१ डिसेंबरच्या आधी वाल्मीक कराडने बीड ते पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. 

राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपी सीआयडी ला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेल्याचे समोर आले आहे. या बाबतीत पुष्टी देणारे तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

३० डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले.

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
 
याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री १.३६ वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे. तसेच याच आलीशन गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे.

पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला. ती गाडी याच ताफ्यातील होती. यामुळे आता या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला काल व्हीसीद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने या प्रकरणात कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वीच खंडणीच्या गुन्ह्यातही कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता मकोकामध्येही त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग आढळल्याने वाल्मीक कराडवर हत्येसह मकोकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं असता कराड याला सुरुवातीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं. प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलीस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीची मागणी न करण्यात आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: walmik Karad and other accused travelled in the same car New CCTV footage comes to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.