शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:03 AM

सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने मागणीचे प्रमाणही कमीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी २ जुलैपर्यंत १२४ कोटी ७५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १३.१३ टक्के इतके आहे. पाऊस चांगला झाल्यास कर्ज मागणीसह वितरणाला गती येऊ शकते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, महाराष्टÑ ग्रामीण बॅँक आणि एसबीआयच्या वतीने कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या जास्त असलीतरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याने मागणीचे प्रमाणही कमीच आहे.बीड जिल्ह्याला यंदाच्या खरीप हंगाम (२०१९-२०) पीककर्जासाठी ९५० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून बॅँकर्स समितीच्या नियमित बैठक होत आहे. तर राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांसाठी पीककर्जासंदर्भात मेळावे घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. १ जूनपासून २ जुलैपर्यंत बीड जिल्ह्यातील राष्टÑीयीकृत , व्यावसायिक आणि सहकारी तसेच ग्रामीण अशा १७ बॅँकांच्या वतीने १२४ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. आलेल्या प्रस्तावानुसार बॅँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार कर्ज वाटपाची कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार शेतकरी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १७ हजार ६३ पात्र शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे.एसबीआयला २९० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. २७४४ शेतक-यांना २६.६३ कोटी रुपयांचे पीक कर्ज या बॅँकेने वाटप केले आहे. तर महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेने ४३७५ शेतक-यांना ३१ कोटी १४ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बॅँकेला २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट् आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ६ हजार २९५ शेतक-यांना २६ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. बॅँक आॅफ बडोदाने ८८८ शेतक-यांना १० कोटी ३० लाखांचे कर्ज वाटप केले आहे. बॅँक आॅफ इंडियाने १०५ शेतकºयांना १.०३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. बॅँक आॅफ महाराष्टÑने ५३० शेतक-यांना ३ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बॅँकेने १०७७ शेतक-यांना ९ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एचडीएफसीने १४३ शेतक-यांना ४ कोटी २३ लाख तर आयसीआयसीआयने ५६८ शेतक-यांना ७ कोटी ५६ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. आयडीबीआयने ८८, अ‍ॅक्सिस बॅँकेने ३२, युनियन बॅँकेने ८३, युको बॅँकेने८५, सिडीकेट बॅँकेने १९, पंजाब नॅशनल बॅँकेने २२ आणि कॅनरा बॅँकेने ९ अशा ३३८ शेतक-यांना ४ कोटी १६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.पावसाची अनिश्चितता : प्रक्रिया संथबीड जिल्ह्यातील १ लाख ८० हजार २२८ पात्र शेतक-यांना ८२८ कोटी ४८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे.मागील वर्ष दुष्काळाचे गेल्याने यंदा पीक कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता होती.जवळपास २ हजार शेतक-यांकडे १ लाख ५० हजारापर्यंत थकबाकी आहे. या शेतकºयांना शासन नियमानुसार कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पूर्तता करण्याचे आवाहन बॅँकांकडून केले जाते मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.यंदा महिनाभर पावसाने हुलकावणी दिल्याने आता चांगल्या स्वरुपात पाऊस झाला तरच पीक कर्ज मागणी वाढू शकते.पावसाच्या अनिश्चिततेमुळे पीक कर्ज मागणी आणि वितरण प्रक्रिया संथ असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना