Video: पोलीस कार्यालयासमोरच दोघांवर तलवार अन् लोखंडी रॉडने हल्ला; बीडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 19:46 IST2021-10-10T19:45:53+5:302021-10-10T19:46:01+5:30
कपिल खान जहीर खान (३५) व अखिल खान झहीर खान (३०, दोघे रा. शहेंशाहवली दर्गा, पेठ बीड) अशी जखमींची नावे आहेत.

Video: पोलीस कार्यालयासमोरच दोघांवर तलवार अन् लोखंडी रॉडने हल्ला; बीडमधील धक्कादायक घटना
बीड: दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा भावंडांवर तलवार, लोखंडी रॉडने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. दोघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी धाव घेताच हल्लेखोर पळून गेले, त्यांची दुचाकी जप्त केली आहे.
कपिल खान जहीर खान (३५) व अखिल खान झहीर खान (३०, दोघे रा. शहेंशाहवली दर्गा, पेठ बीड) अशी जखमींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता ते जात होते. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एका हॉटेलपुढे अडवून तलवार व रॉडने मारहाण केली. यात दोघे गंभीर जखमी झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. मात्र, दुचाकी तेथे सोडून हल्लेखोरांनी पलायन केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोरांची दुचाकी जप्त केली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नसून १० ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
Video: एसपी कार्यालयासमोरच दोघांवर तलवार अन् लोखंडी रॉडने हल्ला; बीडमधील धक्कादायक घटना pic.twitter.com/VcHgQjcRWU
— Lokmat (@MiLOKMAT) October 10, 2021
व्हिडिओ व्हायरल-
दरम्यान, या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात चार ते पाच जण भररस्त्यात तलवार, रॉडने हल्ला करत असून दोन्ही जखमी विव्हळत असल्याचे दिसत आहे. ऐन रस्त्यावर अन् तेही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ही घटना घडल्याने गुंडांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचा सूर आहे.