शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

Video : अखेर प्रतिक्षा संपली.... मुंडेंच्या बीडकडे धावली 'झुक झुक झुक झुक आगीनगाडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 8:29 AM

विकासाचा बालेकिल्ला माझा बीड जिल्हा असे ट्विट करत पंकजा मुंडेंनी बीडच्या दिशेनं धावलेल्या रेल्वेचा व्हिडीओही शेअर केला आहे.

बीड - दिवंगत भाजपा नेते आणि बीडचे लोकप्रतिनिधी गोपीनाथ मुंडेंचे स्पप्न सत्यात उतरतान्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. कारण, गेल्या 70 वर्षांपासून रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या बीडकरांना प्रथमच रेल्वे इंजिनचा आवाज ऐकू आला आहे. बीड जिल्ह्याच्या कानात प्रथमच झुक झुक आगीनगाडीचा निनादा घुमला आहे. याबाबत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी ट्विट करुन समाधान व्यक्त केलं आहे.

विकासाचा बालेकिल्ला माझा बीड जिल्हा असे ट्विट करत पंकजा मुंडेंनी बीडच्या दिशेनं धावलेल्या रेल्वेचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच गेल्या 70 वर्षांपासून बीडवासियांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत असून याचा अत्यानंद होत असल्याचेही पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बीडच्या सोलापूरवाडीपर्यंत ही रेल्वे धावली आहे. त्यामुळे अखेर बीडकरांची प्रतिक्षा संपली असून लवकरच बीडमधून रेल्वे धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून 2019 पर्यंत नगर-बीड रेल्वे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढील एक वर्षात परळीपर्यंतचे सर्व काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली होती. नगर-बीड-परळी हा मार्ग दीर्घकाळापासून रखडला आहे. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाने गती घेतली असून 2019 पर्यंत नगर-बीड रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. 

नगर-परळी मार्ग बनवण्यासाठी निधीची कमतरता असल्यामुळे हे काम रखडले होते. परंतु आता महाराष्ट्रामध्ये 22 हजार कोटी रूपये खर्च करून नऊ मोठे प्रोजेक्ट रेल्वे विभाग व राज्य सरकार यांच्यावतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नगर-परळी मार्गाचा समावेश करण्यात आला असून हा मार्ग बनवण्यासाठी प्राथमिकता दिली जात आहे. या मार्गातील पहिला टप्पा नगर ते नारायण डोह असून तो पूर्ण झाला आहे. सर्वांत प्रथम बीडपर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करून 2019 पर्यत तो पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पुढील एका वर्षात परळीपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पापूर्वी पालकमंत्री ना. पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. पाहा व्हिडीओ - 

 

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे