CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:19 IST2025-01-10T13:17:20+5:302025-01-10T13:19:23+5:30
वाल्मीक कराडचा पाय खोलात गेला असून कारवाईच्या भीतीने आता त्याचे झोप उडाल्याचं दिसत आहे.

CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!
Beed Walmik Karad: पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपात सीआयडी कोठीत असणाऱ्या वाल्मीक कराडची अवस्था बिकट झाली आहे. वाल्मीक कराड सध्या तणावात असून त्याला व्यवस्थित झोपही येत नसल्याने त्याचे डोळे लाल झाले होते. डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्याची तपासणी केली. त्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञांना कॉल दिला. ९ वाजता त्यांनी तपासणी करून औषधोपचार केले.
जास्तीचे जागरण आणि तणावामुळे असे डोळे लाल होऊ शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं. वाल्मीक कराड याने विष्णू चाटेच्या मोबाइलवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंगही सीआयडीच्या हाती लागल्याचे समजते. त्यामुळे वाल्मीक कराडचा पाय खोलात गेला असून कारवाईच्या भीतीने आता त्याचे झोप उडाल्याचं दिसत आहे.
कराडसोबत आलेल्यांची चौकशी?
वाल्मीक कराड हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्त्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. गाडीमालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील सीआयडीच्या रडारवर आहेत.