खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली, सीआयडीचा न्यायालयात अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:31 IST2025-01-04T06:29:41+5:302025-01-04T06:31:24+5:30
सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा खुलासा केला आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर २०२३ रोजी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली, सीआयडीचा न्यायालयात अहवाल
बीड : सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या, तसेच पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिली आहे. वाल्मीकने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, असे चाटे याने कबूल केले आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा खुलासा केला आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर २०२३ रोजी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पूर्णवेळ मदतनीस द्या, कराडचा अर्ज नामंजूर!
- वाल्मीक कराड याला स्लीप एपनिया हा आजार आहे. त्यासाठी ऑटो सीपॅप ही मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे. कराड सहायकाच्या साहाय्याने ती वापरत होता.
- आता कोठडीत या मशीनची आवश्यकता आहे. सहायक कांबळे हे प्रशिक्षित असून, मदतीसाठी त्यांना सोबत द्यावे, असा अर्ज कराडने न्यायालयात दाखल केलेला आहे. परंतु, तो फेटाळल्याची माहिती आहे.
सीआयडी कोठडीत काय तपासणार?
- कराडने अशाप्रकारे खंडणीचे आणखी गुन्हे केले आहेत का?
- या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का?
- आणखी किती व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली?
- सरपंच हत्या व कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाणीच्या घटनेत सहभाग आहे का?
- अशाप्रकारच्या गुन्ह्यांमधून किती मालमत्ता मिळवली?
- कराडवर १५ गुन्हे दाखल, त्याचे आणखी साथीदार कोण?