पैशांच्या देवाणघेवाणीतून मुकादम आणि उसतोड मजुर तलवार, कोयते घेऊन भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 18:28 IST2021-03-27T18:24:13+5:302021-03-27T18:28:27+5:30

मजूर आणि मुकादम यांच्यात लाठ्याकाठ्यासह तलवार, कोयते वापरून तुंबळ हाणामारी झाली.

Ustod Mukadam and a fierce fight between the workers over the exchange of money | पैशांच्या देवाणघेवाणीतून मुकादम आणि उसतोड मजुर तलवार, कोयते घेऊन भिडले

पैशांच्या देवाणघेवाणीतून मुकादम आणि उसतोड मजुर तलवार, कोयते घेऊन भिडले

ठळक मुद्देप्रकरणी 19 जणांवर दिंद्रुड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

दिंद्रुड :  मार्च व एप्रिल महिना म्हणजे उसतोड मजूर व मुकादम यांच्या आर्थिक हिशोबावरुन  संघर्षाचा काळ हा नेहमीचाच विषय झालेला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून ऊसतोड मुकादम व मजुरांमध्ये होणारी बाचाबाची, भांडणे हे नवीन नाहीत. मात्र, आता या वादाने उग्र स्वरूप घेतले असून मोगरा येथे झालेल्या घटनेत मजूर आणि मुकादम यांच्यात लाठ्याकाठ्यासह तलवार, कोयते वापरून तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी 19 जणांवर दिंद्रुड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

त्याचे झाले असे की, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील मोगरा येथील उसतोड मुकादम दगडू भागोजी घनगाव यांचे गावातील उसतोड मजूर सुरज जिजाभाऊ आलाट यांच्यासह 13 जणांकडे काही रक्कम बाकी आहे. घनगाव यांनी आलाट यास पैसे मागितले असता त्याने,'तुझे पैसेही देत नाहीत आणि तुझ्याकडे काम ही करायला येत नाही,  काय करायचे तर कर' असे म्हणून दमदाटी केली. तसेच काट्या, कुऱ्हाडी, तलवार, कोयते याने मारहाण केली. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असल्याची तक्रार दगडू भागोजी घनगाव यांनी दिंद्रुड पोलिसांत केली आहे. मनोज जिजाभाऊ आलाट, सुरज जिजाभाऊ आलाट, बाळू सर्जेराव आलाट,  अमर सर्जेराव आलाट, पवन सटवा कांबळे, किशोर विश्रांता आलाट, संजय मदन आलाट, भाऊ बापू शिंदे, राजेभाऊ मदन आलाट आदींवर दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, याच भांडणात सुरज जिजाभाऊ आलाट या उसतोड मजुराच्या फिर्यादीवरुन दगडू भागोजी घनगाव,  यादा खंडू घनगाव, सुरेश आत्माराम घनघाव, मधुकर भीमराव घनघाव, विकास साधू घनघाव, सुनील संदिपान चोपडे, बाळू रामा घनघाव, आकाश घनघाव, सुभाष घनघाव, साधु घनघाव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आले आहेत. गंभीर जखमींवर बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भादवी कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये कलम ४,२५ नुसार भांडणातील सर्व आरोपींवर दिंद्रुड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस बीट अंमलदार नंदु वाघमारे करीत आहेत.

Web Title: Ustod Mukadam and a fierce fight between the workers over the exchange of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.