परप्रांतीय महिलेचा फोटो वापरून लिहिले, ‘माय लव्ह...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:20+5:302021-09-06T04:37:20+5:30

जाब विचारणाऱ्या पतीला धमक्या : बीडमध्ये एकावर गुन्हा बीड : परप्रांतीय महिलेच्या फोटोसोबत स्वत:चा फोटो जोडून इन्स्टाग्रामवर ‘माय लव्ह’ ...

Using a photo of a foreign woman, he wrote, "My love ..." | परप्रांतीय महिलेचा फोटो वापरून लिहिले, ‘माय लव्ह...’

परप्रांतीय महिलेचा फोटो वापरून लिहिले, ‘माय लव्ह...’

Next

जाब विचारणाऱ्या पतीला धमक्या : बीडमध्ये एकावर गुन्हा

बीड : परप्रांतीय महिलेच्या फोटोसोबत स्वत:चा फोटो जोडून इन्स्टाग्रामवर ‘माय लव्ह’ असे लिहून पोस्ट शेअर केल्याचा प्रकार येथे समोर आला. पतीने जाब विचारला तेव्हा त्यास दमबाजी केली. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंद झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजस्थान येथील २३ वर्षीय कारागीर सुतारकामानिमित्त सध्या बीडमध्ये वास्तव्यास आहे, तर पत्नी त्याच्या मूळ गावी राहते. १ सप्टेंबर रोजी दुपारी त्या कारागिराने स्वतःचे इन्स्टाग्राम खाते उघडले असता त्यावर त्याच्या पत्नीच्या फोटोसोबत एका अनोळखी काळा गॉगल घातलेल्या व्यक्तीचा फोटो जोडून त्यावर ‘माय लव्ह’ लिहिल्याचे दिसून आले. त्यामुळे कारागिराने त्या अनोळखी व्यक्तीला चॅटिंगद्वारे कोण आहेस विचारले असता त्याने अश्लील शिवीगाळ सुरू केली आणि बदनामीचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने स्वतःचा मोबाईल नंबर ००७ असल्याचे सांगितले. असाच प्रकार त्याने त्यानंतर सलग तीन दिवस केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. अखेर त्या कारागिराने शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Using a photo of a foreign woman, he wrote, "My love ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.