दुचाकी-कारची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 19:08 IST2023-04-14T19:08:20+5:302023-04-14T19:08:31+5:30
उपचारासाठी घेऊन जात असताना एकाचा झाला मृत्यू

दुचाकी-कारची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
नितीन कांबळे
कडा : दुचाकी आणि कारचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान धामणगाव येथे घडली. शुभम चौधरी (२५) असे मृत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील शुभम गोरख चौधरी (२२), विठ्ठल अशोक चौधरी (२३ ) हे दोघेजण गुरूवारी सकाळी दुचाकीवरून अहमदनगरला गेले होते. काम आटोपून दोघेही सायंकाळी घराकडे निघाले. याचेवली बीडवरून पुण्याला एक कार ( क्रमांक Gj.01wA0989 ) याच मार्गे येत होती. बीड-धामणगाव रोडवर दुचाकी आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही तरुण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात शुभम याचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी विठ्ठल चौधरीवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम चौधरी वर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी दूपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.