बैलगाडीशी खेळणे बेतले दोन भावंडांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:20 IST2019-04-01T20:19:57+5:302019-04-01T20:20:22+5:30

गाडीत दोन मोठ्या टाक्या असल्याने त्यांना ओरडताही आले नाही.

Two siblings died while playing with bullock cart | बैलगाडीशी खेळणे बेतले दोन भावंडांच्या जीवावर

बैलगाडीशी खेळणे बेतले दोन भावंडांच्या जीवावर

बीड : खेळताना पाण्याचा ड्रम ठेवलेली बैलगाडी अचानक समोरून उलटली. या गाडीखाली दबून दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे सोमवारी (दि.1 ) सायंकाळच्या सुमारास घडली. 
जयदेव (वय ८) व अविष्कार बळीराम राठोड (वय ५ वर्षे) अशी मयत मुलांची नावे आहेत.

सोमवारी बळीराम राठोड यांनी शेतातून पाण्याचा ड्रम भरून बैलगाडीत आणला. सायंकाळच्या सुमारास बैलगाडी घरासमोर सोडली आणि ते बैल बांधण्यासाठी गोठ्यात गेले. याचवेळी ही दोन्ही मुले गाडीजवळ आले. मागच्या बाजुने दोघेही गाडीला लोंबकळले. अचानक गाडीच्या दांड्यावर झाल्या आणि गाडी उलटली. याखाली दोघेही भावंडे दबली गेली. गाडीत दोन मोठ्या टाक्या असल्याने त्यांना ओरडताही आले नाही.

हा प्रकार या मुलांच्या आईने पाहिला. ओरडत ती गाडीजवळ आली. मात्र पाणी असल्याने तिला काहीच करता आले नाही. मोठा आवाज आल्याने तांड्यावरील सर्व लोक जमा झाले आणि या दोघांना बाजूला काढत रूग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही रस्त्यातच मृत्यू झाला होता. 

Web Title: Two siblings died while playing with bullock cart